Wheat Export Ban Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

गव्हावरची निर्यातबंदी शिथील करण्याचा विचार नाही- पीयूष गोयल

भारताचे मैत्रीपूर्ण संबंध असणाऱ्या देशांना गहू पाठवण्यास आम्ही परवानगी देऊ असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या चर्चासत्रात ते बोलत होते.

टीम ॲग्रोवन

गव्हावरील निर्यातबंदी (Wheat Export Ban) शिथिल करण्याचा सरकारचा विचार नसल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि अन्न मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी स्पष्ट केले आहे. भारताचे मैत्रीपूर्ण संबंध असणाऱ्या देशांना गहू पाठवण्यास आम्ही परवानगी देऊ असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या (World Economic Forum) चर्चासत्रात ते बोलत होते.

भारताने १३ मेपासून गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. अलीकडेच जी-७ गटांनी भारताच्या या निर्णयाचा निषेध नोंदवला होता. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले, “भारत जागतिक व्यापाराच्या १ टक्क्यांहून कमी गहू निर्यात करतो. त्यामुळे भारताने गहू निर्यात बंद केल्याने त्याचा जागतिक बाजारावर परिणाम होऊ नये. म्हणून आम्ही ज्यांना गरज आहे, अशा देशांना गहू निर्यातीची परवानगी दिली आहे.”

भारत जागतिक व्यापारात गहू निर्यात करणार देश नव्हता. अलीकडच्या दोन वर्षात भारताची गहू निर्यातदार देश अशी ओळख झाली आहे. गेल्यावर्षी भारताने ७.७५ दशलक्ष टन गव्हाची निर्यात केली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षादरम्यान फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारताने गहू निर्यातीचा उच्चांक गाठला होता, असेही केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले आहे.

यंदा देशांतर्गत गव्हाच्या उत्पादनात घट झाली आहे. यावर बोलताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले, “यावर्षी गव्हाच्या उत्पादनात ७- ८ टक्के वाढ अपेक्षित असताना उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे उत्पादनात घट झाली आहे.”

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Leaf Blight: भातावरील करप्याचे कारण ओळखूनच उपाय करा

Crop Damage: पाऊस पडला तरी पिकांचे नुकसान भरून येणार नाही

Crop Loan Burden : कर्जाआधीच शेतकऱ्यांच्या खिशाला झटका!

Automated Weather Stations: आजऱ्यात हवामान केंद्रांसाठी ६५ ग्रामपंचायतींची सहमती

Maize Threshing: बागायती मका पीक मळणीवर

SCROLL FOR NEXT