Milk Production Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

NABARD Dairy Loan : डेअरी व्यवसायासाठी नाबार्ड देतंय कर्ज; किती लाखांचं मिळणार कर्ज?

देशातील विविध भागातील शेतकरी डेअरी व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. पशुपालनाद्वारे दूध उत्पादनासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांना डेअरी कर्ज देत आहे.

Team Agrowon

NABARD Dairy Loan Scheme: बदलते हवामान (Climate Change), अवकाळी पाऊस, गारपीट या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे (Natural Calamity) शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

त्यातच बाजारातील अनियमिततेमुळे शेतमालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत भावही मिळत नाही. त्यामुळे शेती करणे हा तोट्याचा व्यवसाय झाला आहे.

परिणामी अनेक शेतकरी शेतीपूरक व्यवसायांकडे वळत आहेत. दुग्ध व्यवसाय (Dairy Business) हा शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा चांगला पर्याय बनला आहे. डेअरी व्यवसाय सुरू करण्यासाठी नाबार्ड शेतकऱ्यांना कर्ज (NABARD Dairy Loan) उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा या व्यवसायाकडे प्रामुख्याने कल वाढल्याचे दिसत आहे.

देशातील विविध भागातील शेतकरी डेअरी व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. पशुपालनाद्वारे दूध उत्पादनासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांना डेअरी कर्ज देत आहे. सरकार जनावरे खरेदीसाठी तसेच जनावरांच्या चाऱ्याच्या व्यवस्थेसाठी योजना राबवत आहे. डेअरी उद्योजकता विकास योजना (Dairy Entrepreneurship Development Scheme) ही एक अशीच योजना आहे.

या योजनेंतर्गत डेअरी व्यवसायासाठी विविध प्रकारे कर्ज दिले जाते. यामध्ये पशुधन खेरदी, मिल्किंग मशिन, डेअरी प्रोसेसिंग युनिट, वाहतूक, शीतगृह आणि डेअरी मार्केटींग आऊटलेट यासाठी कर्ज दिले जाते.

योजनेची वैशिष्ट्ये

  • या योजनेंतर्गत सहकारी, प्रादेशिक, व्यावसायिक, ग्रामीण किंवा नाबार्ड बँकांकडून डेअरी व्यवसायासाठी ७ लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.

  • घेतलेल्या कर्जावर सरकारकडून ३३.३३ टक्के अनुदान.

  • कमीत कमी दोन ते कमाल १० जनावरे खरेदी करू शकता.

  • या योजनेसाठी पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाकडून निधी दिला जातो.

  • जनावरांच्या चाऱ्याची तरतूद करण्यासाठी अर्जदाराकडे पूरेशी जमीन असणे आवश्यक

  • १८ ते ६५ वर्ष वयोगटातील पात्र अर्जदार या योजनेचा लाक्ष घेवू शकतात.

योजनेसाठी पात्रता

  • सामान्य शेतकरी

  • असंघटित आणि संघटित क्षेत्रातील गट

  • बचत गट

  • डेअरी सहकारी संस्था

  • दूध उत्पादक संघटना

  • पंचायती राज संस्था

कर्ज घेण्याची प्रक्रिया

डेअरी व्यवसाय योजना कर्ज अर्जासाठी अर्जदाराला जवळच्या सहकारी, प्रादेशिक, व्यावसायिक, ग्रामीण किंवा नाबार्ड बँकेत जावे लागेल. डेअरी उद्योजकता विकास योजनेंतर्गत कर्ज घेण्यासाठीच्या अर्जासोबत इतर आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Politics : जिल्हा बँक, सहकारी साखर कारखाने कोल्हापूर जिल्ह्याचे सत्ता केंद्र; ६ आमदार साखर कारखानदार

Maharashtra Cabinet : पश्चिम विदर्भात अकोला, बुलडाण्याला मंत्रिपदाची आस

Vijay Wadettiwar : महायुती जिंकली अभिनंदन! पण, नवे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते? यावर आमचे लक्ष असेल; वडेट्टीवार यांचा इशारा

Sweet Sorghum Ethanol : गोड ज्वारीच्या इथेनॉल खरेदी दराला केंद्र सरकारचा खोडा?

Onion Market : हंगाम बदल, कांदा चाळ अर्थकारणाला चालना मिळेना

SCROLL FOR NEXT