Lumpy Skin Disease  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Lumpy Skin : नांदेडमध्ये पशुधन बाजार बंद

Nanded Lumpy Skin : जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून गायवर्ग पशुधनामध्ये ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव आढळला आहे. यामुळे अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.

Team Agrowon

Nanded News : ‘‘जिल्ह्यात गायवर्ग पशुधनाला ‘लम्पी स्कीन’ अजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. इतर राज्यांतून येणाऱ्या‍ जनावरांमुळे जिल्ह्यात बाधित होणाऱ्या जनावरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यातील सर्वच जनावरांच्या बाजारातील गायवर्ग जनावरांच्या खरेदी-विक्रीवर बंदी घातली आहे.

जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून गायवर्ग पशुधनामध्ये ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव आढळला आहे. यामुळे अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. हा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्हा ‘लम्पी’बाधित घोषित केला होता. परंतु तरीही प्रादुर्भाव कमी होईना.

जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील १९७ ईसी केंद्रांमध्ये गोवर्गीय पशुधन मोठ्या प्रमाणात बाधित झाल्याचे आढळून आले आहे. याचा प्रसार जनावरांच्या खरेदी विक्री, वाहतुकीमुळे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अभिनियम २००९ नुसार जिल्ह्यात गोवर्गीय पशुधनाच्या खरेदी-विक्रीचे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. म्हैस वर्ग, शेळी व मेंढ्याचे खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू राहतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.

‘पशुसंवर्धन’कडून प्रादुर्भावाची माहिती मिळेना

जिल्ह्यात ‘लम्पी’ची लागण गायवर्ग पशुधनाला झाल्याने हजारो जनावरे बाधित झाली आहेत. प्रादुर्भाव वाढू नये, तसेच बाधित जनावरांची पशुपालकांनी काय काळजी घ्यावी, याबाबत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाकडून दररोज माहितीचे प्रसिद्धिपत्रक मिळत होते.

यामुळे त्याची माहिती प्रसार माध्यमांमार्फत पशुपालकांना मिळत होती. परंतु मागील दोन महिन्यांपासून पशुसंवर्धन विभाग कोणत्याही प्रकारची माहिती देत नसल्याने शेतकऱ्यांना माहिती मिळत नसल्याची स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT