यवतमाळ : पीकविम्याच्या (Crop Insurance) लाभासाठी कंपनीच्या प्रतिनिधीकडून तीनशे रुपयांची मागणी (Money Demand By Crop Insurance Company Employee) होत असल्याचा खळबळजनक आरोप उमरखेड तालुक्यातील धानोरा (सा.) येथील शेतकरी दत्तात्रय काळे यांनी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या लेखी तक्रारीतून हा आरोप करण्यात आला आहे.
शेतकरी आत्महत्याग्रस्त अशी यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे. याच जिल्ह्यात यंदाच्या खरिपात संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यापोटी शासनाने भरपाईसाठी निधीची तरतूद केली. मात्र महसूल आणि कृषी विभागाच्या वादात मदत निधीचे वितरण रखडले आहे.
एकीकडे मदत निधीचे वितरण होत नसताना दुसरीकडे विमा भरपाईसाठी देखील शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. विमा दावा मंजूर होत भरपाई मिळावी याकरिता विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून तीनशे रुपयांची मागणी होत असल्याचा आरोप आहे.
नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी आधीच मेटाकुटीस आला असताना आता विमा कंपनीच्या धोरणांमुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महसूल प्रशासनाने ही बाब आपल्या अखत्यारित नसल्याचे सांगत या प्रकारापासून फारकत घेण्याचे प्रयत्न चालविले आहेत.
त्यामुळे या शेतकऱ्याला न्याय मिळेल किंवा नाही तसेच संबंधित दोषी किंवा कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल किंवा नाही याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये यापूर्वी देखील विमा भरपाईसाठी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून पैशाची मागणी करण्यात आल्याचे आरोप झाले आहेत. त्या प्रकरणात देखील प्रशासनाकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.