Agriculture Drone
Agriculture Drone Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Agriculture Drone Subsidy : राज्यात अनुदानावरील पहिला किसान ड्रोन दाखल

Team Agrowon

Agriculture Mechanization : कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातील किसान ड्रोन (Kisan Drone) योजनेच्या अनुदानास अखेर मुहूर्त लागला आहे. राज्यात पहिला किसान ड्रोन दाखल झाला आहे. पहिल्या टप्प्यात काही कृषी पदवीधर, तसेच निवडक शेतकरी उत्पादक कंपन्यांची (एफपीसी) योजनेसाठी निवड करण्यात आली आहे.

किसान ड्रोनची किंमत अंदाजे दहा लाख रुपये असून पाच लाख रुपये अनुदान दिले जात आहे. ड्रोनला लावण्यात आलेल्या कीटकनाशक साठवणीच्या एका टाकीतून एक एकरचे शेत अवघ्या दहा मिनिटात फवारले जाणार आहे.

त्यासाठी शेतकऱ्याकडून एकरी ३०० ते ५०० रुपये आकारले जातील. देशात २ किलोपासून ते १५० किलो वजनाचे ड्रोन उपलब्ध आहेत. मात्र राज्यात सर्वसाधारणपणे २५ किलो वजनाचे ड्रोन शेतीकामासाठी स्वीकारले जात आहेत.

नगरच्या शेवगावमधील जगदंबा महिला ग्राहक सहकारी संस्थेची किसान ड्रोनसाठी निवड झाली आहे. याशिवाय वैजापूरचा गायत्री शेतकरी बचत गट, जळगावच्या आव्हाणे गावातील समर्थ शेतकरी बचत गट, इंदापूरच्या शेटफळमधील

बारामती अॅग्रो संस्था व लातूरच्या भडगावमधील आधुनिक शेतकरी गटाची निवड ड्रोनसाठी झाली आहे. सचिन हुंबे (ईट, ता. भूम, जि. धाराशिव), ऋषिकेश तरंगे (पापनस, ता. माढा, जि. सोलापूर)

या दोघांची ग्रामीण नवउद्योजक म्हणून ड्रोन योजनेत अनुदानासाठी निवड झाली आहे. शेती मशागतीसाठी ड्रोनचा वापर करणारा व्यवसाय आगामी काळात भरभराटीला येण्याची शक्यता आहे. त्यात आता कृषी पदवीधरांपाठोपाठ महिला संस्थादेखील उतरत आहेत.

कोल्हापूरचे शंकरानंद चौगुले पहिले मानकरी

“कोल्हापूरच्या माद्याळ कसबा येथील कृषी पदवीधर शंकरानंद चौगुले हे राज्यातील पहिल्या किसान ड्रोन योजनेचे अनुदान पात्र लाभार्थी ठरले आहेत. ड्रोनच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या कीटकनाशक खर्चात ३० टक्के, तर पाणी वापरात ९० टक्के बचत होईल. कमी मजुरीत जलद फवारणी होईल. ड्रोनमुळे रोजगार निर्मितीचे नवे दालन ग्रामीण भागात उघडत आहे,” अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

२५ ठिकाणी ड्रोनयुक्त सेवा सुविधा केंद्रे

केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून किसान ड्रोनसाठी निधी मिळाला होता. परंतु, अनुदान मंजूर केले जात नसल्यामुळे कृषी पदवीधर नाराज होते. ड्रोन कृती आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात ३८ ड्रोन दिले जात आहेत. २५ ठिकाणी ड्रोनयुक्त सेवा सुविधा केंद्रे उघडली जात आहेत. अनुदानासाठी कृषी विभागाने सोडत काढून नावे निश्‍चित केली आहेत.

किसान ड्रोनसाठी निवडलेले कृषी पदवीधर ः विवेक आपटे (राणेगाव, ता. शेवगाव, जि. नगर), शहाबाज पटेल (धाराशिव),

विनोद पगार (पालखेड, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर), शंकरानंद चौगुले (माघाल, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), राहुल राजपूत (शेळगाव, ता. जामनेर, जि. जळगाव),

बालाजी म्हस्के (सावरगाव म्हस्के, ता. जाफराबाद, जि. छत्रपती संभाजीनगर), गणेश जाधव (हरणगाव, ता. पेठ, जि. नाशिक), अमोल वाघ (टाकळ गव्हाण, ता. जि. परभणी),

सागर जामदार (बारामती, जि. पुणे), श्रीकांत चव्हाण (हातोला, ता. अंबाजोगाई, जि. बीड), नितीन टाके (दाभाडी, ता. आर्णी, जि. यवतमाळ), अभिषेक पतंगे (वनोजा आसेगाव, ता. रिसोड, जि. वाशीम)

किसान ड्रोनसाठी निवडलेल्या एफपीसी ः कृषिभूषण (वाई, ता. अकोट, जि. अकोला), डेबू (फुलगाव, ता. चांदूरबाजार, जि. अमरावती),

राधानगरी कृषिमित्र (शिरोळी, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), अक्राणी (ब्राह्मणपुरी, ता. शहादा, जि. नंदुरबार), भगवतीदेवी (लिंगापूर, ता. हदगाव, जि. नांदेड),

मल्हारी (बोरी, ता. जिंतूर, जि. परभणी), अमोल ॲग्रो (शिराळा, ता. गेवराई, जि. बीड), कुलभवानी (वडगाव, ता. जळगाव, जि. बुलडाणा), अॅग्रोझिन (वाही, ता. पवनी, जि. भंडारा),

भूमिशक्ती (महागाव, ता. दारव्हा, जि. यवतमाळ), हिंगणघाट कॉटन (हिंगणघाट, जि. वर्धा), अॅग्रोइल्ड्‍स (बोलवड, ता. मिरज, जि. सांगली), अॅग्रोस्पॉट (पेरले, ता. कराड, जि. सातारा), नागनाथ (तुर्क पिंपरी, ता. औंढा, जि. हिंगोली)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : राज्यात कापूस बियाण्याची विक्री १६ मे पासून होणार

Surangi Season : सुरंगीचा हंगाम अंतिम टप्प्यात

Mango Export : युद्धामुळे आंबा निर्यात थंडावली

Vitthal Rukmini Mandir : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे गाभारा संवर्धन काम महिनाअखेर पूर्ण होणार

Strawberry Party : शाळेत रंगली ‘स्ट्रॉबेरी पार्टी’

SCROLL FOR NEXT