Team Agrowon
ड्रोन मनुष्यचलित मोडमध्ये फवारणीसाठी उडवत असताना पिकाच्या निर्देशित केलेल्या उंचीवरून, योग्य त्या वेगाने आणि स्वाथने उडवावा.
ड्रोनद्वारे फवारणीचे काम सुरू असताना फवारणी क्षेत्रांमध्ये मनुष्य किंवा जनावरे जाणार नाही याची खात्री करावी.
ड्रोनचालकाने रसायनाच्या फवारणी करताना सुरक्षेच्या आवश्यक त्या प्रावधानांचा अवलंब करावा.
ड्रोन उडवताना येणारे विविध अडथळे येऊ शकतात. उदा. मोबाईल किंवा जीपीएस सिग्नल जाणे इ. यावर सातत्याने लक्ष ठेवावे.
ड्रोन उडत असताना नेहमी चालकाच्या नजरेच्या टप्प्यात असेल, याकडे लक्ष द्यावे.
ड्रोनचालकाने स्वतःही फवारणी क्षेत्राच्या आत जाऊ नये.
फवारणी करताना धूम्रपान करणे किंवा खाणे वर्ज्य करावे.