Abhay Yojna
Abhay Yojna Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Abhay Yojna : ‘अभय’ योजनेला डिसेंबरपर्यंत वाढ

टीम ॲग्रोवन

जव्हार, जि. पालघर : जव्हार तालुक्यातील ग्रामीण तथा आदिवासी भागामध्ये रोजगाराची कमतरता आणि कौशल्यपूर्ण (Skill Development) शिक्षणाच्या अभावामुळे येथे नेहमीच आर्थिक अडचणी असतात. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून येथील आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी लाभदायक ठरत आहेत. या योजनांपैकीच एक योजना ही विलासराव देशमुख अभय योजना (Vilasrao Deshmukh Abhay Yojna) महावितरणने (MSEDCL)सुरू केली आहे.

या योजनेस मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याने जव्हार तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झालेल्या सहा हजार ग्राहकांना अभय योजनेचा कालावधी ३१ डिसेंबरपर्यंत वाढल्याने दिलासा मिळत आहे. या योजनेनुसार थकबाकीची मूळ रक्कम हप्तेवारीने अथवा एकरकमी भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब आकार पूर्णतः माफ करण्यात येत आहे.

योजनेनुसार ३१ डिसेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी थकबाकीपोटी कायमचा वीजपुरवठा खंडित केलेले सर्व बिगर कृषी उच्चदाब आणि लघुदाब ग्राहक या योजनेत पात्र होते. या योजनेचा कालावधी सहा महिन्यांसाठी (एक मार्च २०२२ ते ऑगस्ट २०२२ पर्यंत) होता.

ही योजना कृषी ग्राहक वगळून सर्व वर्गवारीतील ग्राहकांना लागू आहे. योजनेत ग्राहकांनी थकबाकीची मूळ रक्कम एकरकमी भरली तर त्यांच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार आहे.

हप्तेवारीने भरणाऱ्यांनी ३० टक्के रक्कम भरावी

थकबाकी एकरकमी भरण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांनी उच्चदाबाच्या वीज जोडणीसाठी मूळ थकबाकीच्या ९५ टक्के किंवा लघुदाबाच्या वीज जोडणीसाठी मूळ थकबाकीच्या ९० टक्के आणि सोबतच अर्ज मंजुरीच्या ३० दिवसांच्या आत आवश्यक कायदेशीर शुल्क भरावे लागेल.

शिवाय हप्तेवारीने पैसे भरण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांना पहिला हप्ता हा मूळ थकबाकीच्या ३० टक्के आणि सोबतच अर्ज मंजुरीच्या सात दिवसांच्या आत आवश्यक शुल्क भरावे लागेल.

जव्हार तालुक्यातील सर्व बिगर कृषी उच्चदाब आणि लघुदाब ग्राहकांनी योजनेत सहभागी होऊन योजनेच्या माध्यमातून लाभ घ्यावा.

- विवेक तळणीकर, उपकार्यकारी उपअभियंता, महावितरण, जव्हार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

River Pollution : पाताळगंगा नदीत दूषित पाणी

Animal Husbandry : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागातील ८७ पदे रिक्त

Water Scarcity : वरणगावात १५ दिवसांआड पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त

Landslides : जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे घरे कोसळली; ५०० हून अधिक लोकांचे स्थालांतर

Wrestling : आणि कुस्ती शौकीनांच्या ह्रदयाची धडधड वाढायला लागते

SCROLL FOR NEXT