Crop Damage Compensation  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Damage Compensation : ऐंशी टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा

अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पीक वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने त्यांची दिवाळी साजरी करता यावी म्हणून निधी दिला.

टीम ॲग्रोवन

नागपूर : अतिवृष्टी (Wet Drought) व पुरामुळे (Flood) झालेल्या पीक वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने त्यांची दिवाळी साजरी करता यावी म्हणून निधी दिला. परंतु महिनाभराचा कालावधी होत असताना अद्याप सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेलेच नाही. प्रशासनाच्या दिरंगाईमळे हजारो शेतकऱ्यांची दिवाळी (Farmers Diwali) अंधारात जाणार असल्याचे दिसते.

अतिवृष्टी व पुरामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी हवालदिल झाला. शासनाची मदत ही खर्चाच्या तुलनेत नगण्य असल्याने तो चिंतातूर होता. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय निकषाच्या दुप्पट मदत निधी देण्यासाठीसोबत तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे जाहीर केले. पूर्ण मदत देण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याने १५ सप्टेंबरपासून १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती.

दरम्यान जिल्हा प्रशासनाने २ लाख ६७ हजार ९२ शेतकरी बाधित असून २ लाख ४२ हजार ८११ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचा अहवाल तयार केला होता. या नुकसानीच्या भरपाईसाठी ३३९ कोटी ६८ लाख ५३ हजारांची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. शासनाने त्यास मंजुरी दिली आहे. आठवडाभरापूर्वी याबाबतचा शासन निर्णयही निर्गमित केला.

महिनाभरापूर्वीच शासनाने संपूर्ण ३३९ कोटी ६८ लाखांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वळता केली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तो तालुका स्तरावर पाठविण्यात आला. आतापर्यंत ८० टक्केच शेतकऱ्यांना निधी वाटप झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या आढाव्यात समोर आली. दिवाळीच्या तोंडावर हजारो शेतकरी भरपाईपासून वंचित राहतील अशी भीती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Vaccination : खानदेशात पशुधन लसीकरण संथच

Crop Loan : पीक कर्ज वितरण आढावा बैठकच नाही

Crop Harvesting : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत ज्वारी, मका, काढणी सुरू

Crop Damage Compensation : बीडमध्ये मागणीपेक्षा ६८ कोटी कमी

Save Soil: माती आणि मानवी सभ्यता

SCROLL FOR NEXT