Crop Damage Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : विम्यासाठी आठ लाखांवर पूर्वसूचना

अमरावती आणि अकोला जिल्ह्यांत पीक नुकसानीनंतरही २५ टक्‍के अग्रिम भरपाईचे दावे विमा कंपनीकडून फेटाळण्यात आल्याने आता सारी भिस्त विमा पूर्वसूचनांवर अवलंबून आहे.

टीम ॲग्रोवन

अमरावती ः अमरावती आणि अकोला जिल्ह्यांत पीक नुकसानी नंतरही (Crop Damage) २५ टक्‍के अग्रिम भरपाईचे दावे (Crop Insurance Claim) विमा कंपनीकडून (Insurance Company) फेटाळण्यात आल्याने आता सारी भिस्त विमा पूर्वसूचनांवर अवलंबून आहे. परिणामी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतून सुमारे ८ लाख ३९ हजार ६७८ शेतकऱ्यांनी कंपनीला भरपाईच्या अनुषंगाने माहिती दिली आहे.

त्यामध्ये सर्वाधीक ३ लाख ६६ हजार पूर्वसूचना यवतमाळ जिल्ह्यातून प्राप्त झाल्या आहेत. गेल्या हंगामात पावसाने ओढ दिली असली तरी यंदा मात्र जुलै महिन्यांपासून आजवर पावसाची रिपरिप सुरुच आहे. अमरावती विभागातील यवतमाळ, अमरावती जिल्ह्यात पावसाने सर्वाधीक नुकसान झाल्याची नोंद आहे.

संततधार पाऊस, अतिवृष्टीचा सर्वाधीक फटका सोयाबीनला बसला. त्याच्या परिणामी सोयाबीन उत्पादकतेत घट होणार असल्याने अमरावती व अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढत विमा कंपन्यांना २५ टक्‍के अग्रिम भरपाईचे आदेश दिले. मात्र रॅन्डम सर्व्हे झाला नसल्याचे कारण देत विमा कंपन्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश फेटाळले.

त्यामुळे आता भरपाईची सारी भिस्त पीक कापणी प्रयोगांवरच असणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांकडून देखील कंपनीला पूर्वसूचना देण्याची लगबग वाढली होती. आजवर अमरावती विभागातून सुमारे ८ लाख ३९ हजार ६७८ पूर्वसूचना कंपन्यांकडे दाखल झाले आहेत.

त्यामध्ये सर्वाधीक यवतमाळ जिल्ह्यातील पूर्वसूचनांचा समावेश आहे. तब्बल ३ लाख ६६ हजार ४२४ पूर्वसूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ३०४९२८ पंचनाम्याचे काम झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यातून १ लाख ७६ हजार ४७ पूर्वसूचनांपैकी १,०६,७२१ पंचनामे झाले आहेत.

अकोला ५२०१७ पूर्वसूचनांपैकी ३७३७५ पंचनामे झाले आहेत. वाशीम जिल्ह्यातून कंपनीला १ लाख ४३ हजार ३७ पूर्वसूचना मिळाल्या असून त्यातील १२६१०९ पंचनामे झाले आहेत. तर अमरावती जिल्ह्यात १०२१५३ प्राप्त पूर्वसूचनांपैकी ६९४३५ सूचनांमध्ये पंचनाम्याची प्रक्रिया पूर्णत्वास गेल्याची माहिती

कृषी विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये विमा संरक्षित रक्‍कम ५८५४ कोटी इतकी आहे. त्यामध्ये बुलडाणा १२२२.३१, अकोला १०७७.३८, वाशीम ९८३.५०, अमरावती ८८४.२६, यवतमाळ १३८६.०५ कोटी रुपये आहे. क्षेत्र

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT