Crop Insurance Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : पानपिंपरी, सफेद मुसळीला पीकविम्याच्या कक्षेत आणा

सद्यःस्थितीत पानपिंपरीची लागवड चालू आहे. ही लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘मनरेगा’चा फायदा व्हावा, यासाठी अनुदानाच्या हेतूने प्रस्ताव स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली जावी, असेही सदस्यांनी सुचवले.

Team Agrowon

Crop Insurance Scheme अकोला ः जिल्ह्यासह या भागातील इतर जिल्ह्यांत वनौषधी, पानमळे केले जातात. या पिकांना पीकविम्याच्या (Crop Insurance) कक्षेत आणून शेतकऱ्यांना पाठबळ द्यावे, अशी मागणी मंगळवारी (ता.१४) झालेल्या औषधी वनस्पती (Medicinal Plant) व शेतकरी विकास अभियान विभागीय समितीच्या बैठकीत सदस्यांनी केली.

अमरावती विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या प्रमुख उपस्‍थितीत समितीची बैठक झाली. या वेळी समितीचे विभागातील सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीत सदस्यांनी पानपिंपरी, विड्याचे पानमळे व सफेद मुसळीला पीकविम्याच्या कक्षेत आणावे. इतर पिकांसाठी जसे ट्रिगर लावले जातात, ते निकष या पिकांना लावून तातडीने उपाययोजना करावी. शासनाने ‘मनरेगा’मध्ये पान पिंपरीचा समावेश केला आहे.

सद्यःस्थितीत पानपिंपरीची लागवड चालू आहे. ही लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘मनरेगा’चा फायदा व्हावा, यासाठी अनुदानाच्या हेतूने प्रस्ताव स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली जावी, असेही सदस्यांनी सुचवले.

अकोला जिल्ह्यात ३०० हेक्टरवर क्षेत्र

तेल्हारा, अकोट तालुक्यांत पानपिंपरी, सफेद मुसळी, पानवेलीची लागवड केली जाते. हे क्षेत्र किमान ३०० हेक्टरपेक्षा अधिक आहे. यात प्रामुख्याने मागील काही वर्षांत पानपिंपरीची लागवड वाढली आहे. २०२१-२२ च्या हंगामात जिल्ह्यात २७२ हेक्टर क्षेत्रावर पानपिंपरीची लागवड झाली होती.

जिल्ह्यात २०१९ पासून तर २०२१-२२ या वर्षापर्यंत सुमारे ७५० हेक्टरपेक्षा अधिक लागवड झाली आहे. अशाच प्रकारे ५० ते ६० हेक्टरदरम्यान सफेद मुसलीचीही लागवड केली जाते. पानवेलीसाठी हा भाग प्रसिद्ध होता. कालांतराने पानवेलीचे क्षेत्र आता खूप कमी झाले आहे. शासकीय नोंदीनुसार हे क्षेत्र १० हेक्टरच्या आत आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Devendra Fadnavis: नर्मदा प्रकल्पाचा वाद मिटला, महाराष्ट्राला १० टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा

PM Crop Insurance Scheme: खरिप हंगामातील पाच पिकांना पीकविमा योजना लागू

Kurnoor Dam Water Storage: कुरनूर धरणात केवळ २५ टक्के पाणीसाठा; शेतकरी चिंतेत

Irrigation Technology: सिंचन जल व्यवस्थापनातील त्रिशूल मॉडेलचा अवलंब गरजेचा : डॉ. सारंगी

Farmer Protest: शेतीपंपांना केवळ दोन तास वीज; करमाळा तालुक्यातील शेतकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT