Radhakrushna Vikhe Patil Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Government Scheme : योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा ः विखे-पाटील

उत्पादनवाढीसाठी शेतीला यांत्रिकीकरणाची जोड दिली जात आहे. शेतकरीहितासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बांधावर पोहोचवाव्यात,’’ असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

टीम ॲग्रोवन

नगर ः ‘‘उत्पादनवाढीसाठी शेतीला यांत्रिकीकरणाची (Agriculture Mechanization) जोड दिली जात आहे. शेतकरीहितासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना (Government Scheme) कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बांधावर पोहोचवाव्यात,’’ असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील (Radhakrushna Vkhe Patil) यांनी केले. संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथे कृषी विभागातर्फे ट्रॅक्टर, रोटाव्हेटर व ब्लोअरचे वितरण करण्यात आले.

विखे-पाटील म्हणाले, ‘‘नैसर्गिक संकट आणि आव्‍हानांवर मात करून शेतकरी कृषी क्षेत्रात प्रगती साध्‍य करीत आहे. कोविड काळात बळीराजा शेतामध्‍ये कष्‍ट करून जगाची भूक भागवीत होता. देशाच्‍या अर्थव्‍यवस्‍थेलाही कृषी क्षेत्रानेच बळकटी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकारने विविध योजनांद्वारे कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरणाला मोठे प्रोत्‍साहन दिले आहे. या योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी सरकारबरोबरच कृषी विभागाचीसुद्धा आहे.’’ झरेकाठी येथील दादासाहेब वाणी यांना कृषी योजनेतून रोटाव्‍हेटर, सुभाष चकोर यांना ब्‍लोअर, पुष्‍पलता पाटील. नामदेव व्‍यवहारे, सोमनाथ डोळे यांना ट्रॅक्‍टर देण्यात आले.

‘अतिवृष्टिग्रस्तांना मदत या महिन्यातच’

‘‘अतिवृष्टीत नुकसान झालेल्या राज्‍यातील शेतकऱ्यांना मदत, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्‍याचा महत्त्वपूर्ण निर्णय नव्‍या सरकारने घेतला आहे. याची अंमलबजावणी या महिन्‍यातच सुरू होईल,’’ अशी ग्‍वाही मंत्री विखे-पाटील यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage: 'आता पाऊस पडला तरी पीक हाताला लागणार नाही', वस्तुनिष्ठ पंचनामे, अहवाल सादर करण्याचे निर्देश, सहकारमंत्री शेतीच्या बांधावर

Fodder Depot Demands: चारा छावण्या सुरू करा : पडळकर

Maratha Reservation Protest: नातवंडांच्या भवितव्यासाठी सत्तरीतील आजोबा आंदोलनात

Cotton Crop Crisis: खानदेशातील कोरडवाहू कापूस संकटात

Mrig Bahar Banana Cultivation: खानदेशात उशिराची मृग बहर केळी लागवड सुरूच

SCROLL FOR NEXT