Cotton Crop Damage: खानदेशात जून व ऑगस्ट या महिन्यांत अपेक्षित पावसापेक्षा अल्प पर्जन्यमान राहीले. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. परंतु नंतर प्रतिकूल स्थिती आहे. यामुळे कोरडवाहू कापूस पिकाला फटका बसला आहे. .कापूस पीक कमी पावसात तग धरत नाही. सध्या फक्त काळ्या कसदार जमिनीत व पूर्वहंगामी (बागायती) कापूस पिकाची स्थिती बरी आहे. हलक्याजमिनीत मात्र पिकाची वाताहत झाली आहे. पिकात कैऱ्या, पाते-फुले हवे तसे नाहीत. अनेकांनी कापूस लागवड जुलैत केली होती. पावसाचे दिवस खानदेशात मागील ८० ते ८५ दिवसात कमी राहीले आहे. कोरडवाहू कापूस पीक कमी पावसात पावसात जोमात येत नाही. यामुळे या पावसाचा फटका पिकास बसला आहे. पीक पिवळे, लाल पडले आहे..Rainfall Deficit: पिके कोमेजू लागली, पावसाचा मोठा खंड .पाते-फले गळू लागलीकोरडवाहू कापसाची उंची कमी आहे. त्यात फुले, पाते गळून खाली पडली आहेत. पिकाची वाढही खुंटली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. खानदेशात जळगावातील अमळनेर, चोपडा, जळगाव, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, चाळीसगाव, पाचोरा, पारोळा, धुळ्यातील शिरपूर, धुळे, नंदुरबारातील शहादा, तळोदा, नंदुरबार आदी क्षेत्रात पूर्वहंगामी कापूस पीक काळ्या कसदार जमिनीत असते. पांझरा, अनेर, तापी, गिरणा, कांग, वाघूर, गोमाई आदी नद्यांच्या भागात काळी कसदार जमीन आहे. या जमिनीत पाण्याचा निचरा होत नाही. या भागात कापूस पीकस्थिती बरी आहे. पण अन्यत्र स्थिती बिकट आहे. कारण रोज ऊन पडत आहे..Farmers Issues: जळगाव, धुळ्यात कमी उत्पादनामुळे शेतकरी अडचणीत.क्षेत्र मोठेखानदेशात कोरडवाहू कापूस पीक सुमारे सहा लाख हेक्टरमध्ये आहे. अडीच ते तीन लाख हेक्टरवरील कापूस पिकाला कमी पावसाचा फटका बसला आहे. त्यात पावसाचा ताण वाढल्याने वाफसा नाहीसा झाला. त्यात सिंचनासाठी पाणी नसल्याने अडचणी आहेत..लागवड घटलीखानदेशात यंदा कापूस लागवड घटली आहे. मागील हंगामात आठ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली होती. यंदा कापसाची लागवड जळगाव जिल्ह्यात सुमारे २० हजार हेक्टरने कमी झाली आहे. मागील हंगामात कापूस लागवड जळगावात चार लाख ८५ हजार हेक्टरवर झाली होती. यंदा ही लागवड चार लाख ५५ हजार हेक्टरवर झाली आहे. कापूस पिकात मोठा तोटा मागील काही वर्षे येत असल्याने लागवड घटली आहे..त्यात यंदा कमी पावसाने नुकसान झाले आहे. धुळे व नंदुरबारातही लागवडीत काहीशी घट झाली आहे. धुळ्यात सुमारे एक लाख ९० हजार हेक्टरवर तर नंदुरबारात सुमारे ९१ हजार हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. यंदा पाऊसमान कमी असल्याचे भाकित होते. कमी पावसात कापूस पीक जोमात येत नाही, असे शेतकरी मानतात. याशिवाय मजूरटंचाई, कापसाचा अस्थिर बाजार, वाढते निविष्ठा दर, फसवणूक, सरकारी अनास्था, तोटा यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची लागवड कमी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.