Horticulture Subsidy | Schemes of NHB
Horticulture Subsidy | Schemes of NHB Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Horticulture Scheme : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी करा अर्ज

Team Agrowon

सोलापूर ः महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत (Employment Guarantee Scheme) लाभ घेता येऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांसाठी संधी मिळावी, याकरिता शासनाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना (Horticulture Scheme) सुरू केली असल्याची माहिती उत्तर सोलापूर तालुका कृषी अधिकारी श्रीमती मनीषा मिसाळ (Manisha Misal) यांनी दिली.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत एकूण १६ बहुवार्षिक फळपिकांचा समावेश करण्यात आला असून, शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार किंवा कृषी हवामान क्षेत्रास अनुसरून असलेल्या फळपिकांच्या कलमांची रोपांची कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या वाणाची लागवड करण्याची मुभा देण्यात आली आहे.

या योजनेकरिता किमान ०.८० हेक्टर ते ६ हेक्टरपर्यंत क्षेत्र मर्यादा असून, या योजनेत प्रामुख्याने आंबा कलमी, पेरू कलमी, डाळिंब कलमी, कागदी लिंबू कलमी सीताफळ कलमी नारळ रोपे, तसेच मोसंबी, काजू, संत्रा, जांभूळ, चिंच, आवळा, चिकू आदी फळपिकांकरिता अनुदान दिले जाते. शासनाकडून खड्डे खोदणे, कलमे व रोपे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे तसेच ठिबकद्वारे पाणी देणे याकरिता अनुदान देण्यात येते.

या योजनेच्या लाभासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या महाडीबीडी पोर्टल या संकेतस्थळावरून अर्ज करावेत. तसेच अधिक माहितीसाठी संबंधित आपल्या गावातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा, असेही आवाहन तालुका कृषी अधिकारी मिसाळ यांनी केले आहे.

वैयक्तिक शेततळे योजना

मुख्यमंत्री शाश्‍वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश करण्यात आला आहे. विविध आकारमानाच्या शेततळ्यांसाठी या योजनेतून अनुदान देण्यात येणार आहे. वैयक्तिक शेततळ्यासाठीही कृषी विभागाच्या महाडीबीटी या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT