Crop Insurance  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Fruit Crop Insurance : फळपीक विम्यासाठी अर्ज स्वीकारणे सुरू

Crop Insurance Scheme : मृग बहरासाठी राज्याच्या २६ जिल्ह्यांमधील फळबागांना हवामान आधारित विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत एक लाखाच्या आसपास फळ उत्पादक सहभागी होण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Pune News : मृग बहरासाठी राज्याच्या २६ जिल्ह्यांमधील फळबागांना हवामान आधारित विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत एक लाखाच्या आसपास फळ उत्पादक सहभागी होण्याची शक्यता आहे. मात्र कर्जदार शेतकऱ्यांना विमा नको असल्यास तसे घोषणापत्र द्यावे लागेल; अन्यथा विमाहप्ता परस्पर कापला जाणार आहे.

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गतच राबविली जाते. यंदा २०२३ च्या मृग बहराच्या फळबागांसाठी अर्ज स्वीकारणे केव्हा सुरू होणार, याविषयी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता होती. संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ व द्राक्ष अशी फळपिके या योजनेत आहेत. ही विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी किंवा भाग न घेण्यासाठी शेतकऱ्यांना एक घोषणापत्र द्यावे लागेल. पीककर्ज खाते किंवा किसान क्रेडिट कार्ड खाते असलेल्या बॅंकेत शेतकऱ्यांना हे घोषणपत्र जमा करावे लागेल.

मात्र कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास तसे घोषणापत्र विमा योजनेतील संबंधित पिकाच्या सहभागाच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर बँकेत द्यावे लागेल. त्यामुळे परस्पर विमा हप्ता कापला जाणार नाही.

घोषणापत्र न देणारे फळ उत्पादक कर्जदार शेतकरी विमा योजनेत सहभागी आहेत, असे गृहीत धरले जाईल व त्यांची विमा हप्ता रक्कम कर्ज खात्यातून वजा केली जाईल.

अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे, कुळाने किंवा भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. मात्र एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी मृग व आंबिया बहर मिळून अधिकाधिक फक्त चार हेक्टर क्षेत्रमर्यादेपर्यंत विमा नोंदणी राहील, अशी अट टाकण्यात आली आहे.

त्यातही पुन्हा केवळ उत्पादनक्षम बागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू असेल. उत्पादनक्षम नसलेल्या म्हणजेच कमी वयाच्या बागांचा विमा काढल्याचे आढळल्यास विमाहप्ता जप्त होईल व विमा भरपाईदेखील मिळणार नाही, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

जिल्हानिहाय विमा कंपन्या अशा...

- नगर, अमरावती, नाशिक, वाशीम, यवतमाळ, धुळे, पालघर, सोलापूर, नागपूर जिल्हा : रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी (टोल फ्री क्रमांक 18001024088, दूरध्वनी क्रमांक 02268623005)

- बीड, छत्रपती संभाजीनगर, अकोला, सांगली, वर्धा, ठाणे, हिंगोली, सातारा, परभणी, जालना, लातूर, कोल्हापूर जिल्हा : एचडीएफसी अॅग्रो जनरल इन्शुरन्स ( संपर्क 18002660700, 02262346234)

- बुलडाणा, जळगाव, नांदेड, पुणे, धाराशिव जिल्हा : भारतीय कृषी विमा कंपनी (संपर्क 18004195004, 022 61710912)

संत्रा, द्राक्षाला १४ जून, डाळिंबाला १४ जुलैपर्यंत मुदत

विमा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना राष्ट्रीय पीक विमा योजनेच्या https://pmfby.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. अर्ज भरण्यासाठी बॅंका, वित्तीय संस्था, ई-सेवा केंद्रांची मदत घेता येईल.

अंतिम मुदत संत्रा, पेरू, लिंबू, द्राक्षासाठी १४ जूनपर्यंत आहे. मोसंबी व चिकूसाठी ३० जूनपर्यंत, तसेच डाळिंबासाठी १४ जुलैपर्यंत, तर सीताफळासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज भरता येतील, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT