agrowon editorial
agrowon editorial 
संपादकीय

कृषी व्यवसायासाठी 'स्मार्ट' संजीवनी 

डॉ. प्रीती सवाईराम 

या पुढे वैयक्तिक शेती उत्पादने ही कालबाह्य कल्पना ठरणार आहे. शेतकऱ्यांनी शेतमालाच्या उत्पादनासाठी संघटित होऊन जोमाने कामाला लागले पाहिजे. कोविड -१९ च्या आपत्तीने जगाला भानावर आणले आहे. कृषीक्षेत्राने या संकटाशी दोन हात केले आहे. सर्व महत्वाच्या निर्णयांत कृषीक्षेत्र केंद्रस्थानी असले तरी शेतकऱ्यांच्या पदरात थेट काहीही पडत नसल्याने तो 'अस्वस्थ' आहे. या वास्तवाकडे सर्व जबाबदार घटकांचे लक्ष वेधण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. शेतकरी जगासोबत चालण्याची तयारी करीत आहे. केंद्र शासनाने 'वन नेशन-वन मार्केट' ची घोषणा केली. शेतीतून आवाज आला,'ग्लोबल मार्केट'! आपल्या देशातील शेतकरी जागतिक बाजारपेठांकडे डोळे लावून बसले आहेत. नाशिकच्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी द्राक्ष उत्पादकांसाठी जो 'जागतिक बाजारपेठांचा मळा'फुलविला, त्यातून राज्यातील शेतमाल उत्पादकांना नवचैतन्याचा कैफ चढला, तर आपण भाग्यवान ठरू! कृषी व्यवसायासाठी आज राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपन्याची आवश्यक्ता निर्माण झाली आहे.

शेतमालाच्या उत्पादनापासून उपभोगापर्यंत सर्व कार्यांची व घटकांची मूल्यसाखळी यापुढे अधिक मजबूत होण्याची आवश्यक्ता आहे. राज्यात अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या अस्तित्वात येत आहेत. ही प्रगतीपथाची चुणूक असली तरी या दिशेने अधिक विकेंद्रीकरण झाले पाहिजे.  देशांतर्गत आणि विदेशात शेतकऱ्यांकडून शेतमालाची विक्री होणे, ही आजवर एक अवघड, किचकट, तांत्रिक प्रक्रीया समजल्या गेली होती. मात्र कोविडच्या संकटाने समाज आणि शेतकरी यांच्या परंपरागत कल्पनाच बदलून टाकल्या आहेत. या संकटात शेतकऱ्यांनी शेतमाल थेट ग्राहकांच्या दारी विकून बाजाराला ताब्यात घेण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आणि प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी आणि ग्रामीण क्षेत्राच्या विकास आणि परिवर्तनासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. बळीराजाच्या सर्वांगसुंदर विकासासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने कृषी व उपजीविका क्षेत्रातील 'स्मार्ट' प्रकल्प कृषी व्यवसायीकांच्या स्वप्नपुर्तीसाठी शासनाने टाकलेले पाऊल आहे. कृषी व्यवसाय व उद्योग निर्मिती करणे, जागतिक बाजारपेठांमध्ये प्रवेश करणे, पिकांची उत्पादकता वाढविणे तसेच हवामानाच्या बदलानूसार जोखीम व्यवस्थापन करणे असे स्मार्ट प्रकल्पाचे धोरण आहे. 

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातून लहान आणि सिमांत शेतकरी तसेच कृषी नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत करणारी व्यवस्था निर्माण झाली आहे. मूल्यसाखळीचा विकास केल्यामुळे उत्पादित शेतमालाची मालकी एका घटकापासून दुसऱ्या घटकापर्यंत जाते. या प्रक्रियेत शेतमालाच्या किंमतीत वाढ होतांना दिसते. मूल्यसाखळीचा विकास केल्याने ग्राहकाने अदा केलेल्या रूपयामध्ये उत्पादकाचा हिस्सा वाढतो. मूल्यसाखळीत सहभागी असलेल्या घटकांची कार्यक्षमता वाढून घटकांमध्ये समन्वय आणि विश्वासाचे वातावरण तयार होते. त्यामुळे मूल्यसाखळी स्पर्धात्मक बनते. 

शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरलेल्या 'स्मार्ट 'प्रकल्प २१०० कोटी रूपयांचा आहे. जागतिक बॅकेने पहिल्यांदाच स्मार्ट प्रकल्पासाठी १४७० कोटींचे कर्ज दिले आहे. राज्यशासनाचा ५६० कोटींचा हिस्सा असून खाजगी उद्योगक्षेत्राच्या माध्यमातून ७० कोटींची उभारणी करण्यात आली आहे. स्मार्टमुळे शेतकरी संघटित होऊन खरेदीदारांशी थेट जोडले जाणार आहेत. प्रक्रीया उद्योग, निर्यांतदार, संघटित किरकोळ विक्रेते यांना सोबत घेण्याची ही अलैकीक समन्वय पद्धत ठरणार आहे. स्मार्टच्या कार्यातून संपूर्ण मूल्यसाखळीतील सर्व घटकांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. स्मार्टच्या लाभार्थी शेतकरी संस्था अशा आहेत.  - समुदाय आधारीत नोंदणीकृत संस्था - शेतकरी उत्पादक कंपनी - महिला बचत गटाचे संघ - प्राथमिक कृषी सहकारी संस्था - उत्पादक संघ - आत्मा यंत्रणेकडे नोंदणी झालेले उत्पादक गट - व्हीएसटीएफ गावसमुह इत्यादी. 

स्मार्टच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी संघटित असणे, ही प्रमुख अट आहे. बळीराजाचे संघटन पुढील प्रवासात महत्वपूर्ण ठरणार आहे. स्मार्ट प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची यंत्रणा सक्षम असून कृषी विभागासह, पशुसंवर्धन, पणन, सहकार, महिला व बालकल्याण, ग्रामविकास व नगरविकास विभागाचा उत्तम सहभाग या प्रकल्पात दिसून येतो. स्मार्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी सहाय्य केले जाणार आहे. औजारे, उपकरणे, गोदाम, काढणी पश्चात पायाभूत सुविधांसाठी आर्थिक व तांत्रिक मदत केली जाणार आहे. या प्रकल्पाचे काही उपप्रकल्प असून बाजार संपर्कवाढ उपप्रकल्प किंवा धान्य गोदाम आधारित उपप्रकल्पातून धान्य साठवणूक व साठवणूक पश्चात धान्य तारणाबाबतचे कार्य या उपक्रमांतर्गत होणार आहे तसेच ग्रामपातळीवर गोदाम साठवणूक सुविधांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. स्मार्टअंतर्गत मूल्यसाखळी विकासशाळा ही नवीन संकल्पना राबविण्यात येत आहे. 

राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनासंदर्भात योग्य मार्गदर्शन करण्यासाठी कृषी आयुक्तालयात स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. कृषी विपणन सेवा कक्षाच्या माध्यमातून जागतिक व देशांतर्गत लागवड क्षेत्र, संभाव्य उत्पादन, साठवणूक, मागणी व बाजारभाव या माहितीचे विश्लेषण करून प्रमुख पिकांच्या संभाव्य बाजारभावांचे अंदाज अहवालाचे प्रसारण करणे, लागवडीच्या वेळेस बाजारभावाच्या अंदाजानूसार आगामी हंगामात कोणती पिके घ्यावीत याचे मार्गदर्शन केले जात आहे. काढणीच्या वेळेस बाजारभावाच्या अंदाजानूसार शेतमाल विक्री करावा अथवा गोदामात साठवणूक करावी याचे दिशादर्शन केले जाते. यासोबतच बाजारभावाच्या अंदाजाचे प्रसारण, मोबाईल संदेश, वेबसाईट, कार्यशाळा, माहितीपुस्तिका, प्रदर्शने या माध्यमातून ‘स्मार्ट प्रकल्प’ शेतकऱ्यांपर्यंत पोचणार आहे. यापुढील काळात 'स्मार्ट प्रकल्प'कृषी व्यवसायासाठी नवसंजीवनी ठरणार आहे, हे निश्चित! 

डॉ. प्रीती सवाईराम 

preeti.sawairam@yashada.org  (लेखिका यशदामध्ये सहाय्यक प्राध्यापिका आहेत.)   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT