हमीभावाच्या (MSP) कायद्यासह शेतकऱ्यांच्या विविध मुद्यांवर शब्द फिरवलेल्या केंद्र सरकारविरोधात येत्या १३ मार्चपासून आश्वासनभंग आंदोलन सुरु करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय किसान युनियनचे (Bharatiya Kisan Union) राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत यांनी दिली आहे.
अफजलगढ येथील पत्रकारपरिषदेत टिकैत बोलत होते. यावेळी भारतीय किसान युनियनचे (Bharatiya Kisan Union) पदाधिकारी विजयपाल सिंग, महेंद्र सिंग, रोहित राणा, नरदेव सिंग आणि अरुण चौधरी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे (Three contentious farm laws) रद्द करावे, या मागणीसाठी तब्बल वर्षभर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सिमेवर आंदोलन केले होते. केंद्र सरकारने कायदे रद्द केल्यानंतरच शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले होते. मात्र, सरकारने त्यावेळी शेतकऱ्यांच्या अन्य मागण्या मान्य करण्याचे आश्वासनही शेतकऱ्यांना दिले होते.
यात हमीभावाच्या (MSP) कायद्यासाठी समिती स्थापन करणे, किसान आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांवरील खटले परत घेणे, किसान आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, सरकारी सेवेत संधी, लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा राजीनामा अशा अनेक मागण्या पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिल्यावरच किसान आंदोलन थांबवण्यात आले होते. या आश्वासनांपैकी एकाही आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नसल्याचे टिकैत म्हणाले आहेत.
व्हिडीओ पहा-
अद्याप शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे संयुक्त किसान मोर्चाने (Samyukt Kisan Morcha) पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्या आंदोलनाची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर पुन्हा एकदा शेतकरी त्यांच्या अन्य मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. हमीभावासह उर्वरित मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी (Farmers Organisations) पुन्हा आंदोलन सुरू करण्याची तयारी केली आहे. १० मार्चनंतर शेतकरी संघटना दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत ज्या शेतकरी संघटना (Farmers Organisations) सामील झाल्या आहेत, त्या देखील या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. आंदोलन पुन्हा सुरू करण्यासाठी नि.वडणूक लढवणाऱ्या संघटनांनाही बैठकीसाठी बोलावण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर टिकैत यांनी येत्या १३ मार्चपासून सरकारने केलेल्या विश्वासघाताविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.