narendra modi
narendra modi  
मुख्य बातम्या

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सुरक्षा यंत्रणेत फारशी सुधारणा नाही: मोदी

टीम अॅग्रोवन

गांधीनगर: स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आवश्‍यक असणाऱ्या सुरक्षा यंत्रणेत गरज असतानाही फारशी सुधारणा झाली नाही, अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदीPrime Minister Narendra Modi) यांनी व्यक्त केली. पोलिस यंत्रणेबाबत समाजाचा एक समान दृष्टिकोन पसरलेला असून तो म्हणजे त्यांच्यापासून दूर राहा. पण यात आता बदल करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

गांधीनगर येथील रक्षाशक्ती युनिव्हर्सिटीच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी गृहमंत्री(Home Minister) अमित शहा देखील होते. यावेळी त्यांनी ३७ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक आणि १४ जणांना डॉक्टरेट प्रदान केले. मोदी म्हणाले, की महाविद्यालय असो किंवा विद्यापीठ असो ते विकासात मोठे योगदान देतात. यासाठी दोन उदाहरणे सांगतो. ६० वर्षापूर्वी एका उद्योगपतीने (industrialist)अहमदाबाद येथे फार्मसीचे कॉलेज स्थापन केले. ते आज फार्मा उद्योगाचे नेतृत्व करत आहे. त्याचवेळी आयआयएम देखील स्थापन झाले आणि या संस्थेने जागतिक उद्योगांना नेतृत्व देण्याचे काम केले आहे. याप्रमाणे रक्षाशक्ती युनिव्हर्सिटीने देखील संरक्षण क्षेत्राचे नेतृत्व निर्माण करावेत, अशी अपेक्षा आहे.

स्वातंत्र्यानंतर सुरक्षा यंत्रणेत व्यापक बदल आणि सुधारणा घडवून आणणे गरजेचे होते. परंतु त्यादृष्टीने फारसे बदल झाले नाहीत, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. सर्वसामान्य नागरिक आणि पोलिस यांच्यात मैत्री आणि विश्‍वास वाढण्यासाठी प्रशिक्षणाच्या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. या आधारे देशभरात रक्षाशक्ती विद्यापीठाचा विस्तार केला जाईल. साधारणपणे आपल्या देशात पोलिसांविषयी वेगळी प्रतिमा सादर केली जाते. चित्रपट असो किंवा वर्तमानपत्र असो, पोलिसांची खरी प्रतिमा समाजापर्यंत पोचत नाही. कोरोना काळात पोलिसांनी केवळ नागरिकांना केवळ सुरक्षाच दिली नाही तर अन्नधान्य आणि औषधी देण्याचेही काम करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे, असे मोदी म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Fertilizer : जळगावात मुबलक खतांसाठी कृषी विभागाची दमछाक

Mahabeej Workshop : कानशिवणी येथे ‘महाबीज’ची शेती कार्यशाळा

Maharashtra Rain : विदर्भात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज

Drought 2024 : देशातील प्रमुख धरणात पाणीसाठा घटला; पाणीसंकट गंभीर ?

Sludge Remove Campaign : ‘घरणी’तील गाळ उपसा मोहिमेची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT