Pneumonia vaccine Agrowon
मुख्य बातम्या

Pneumonia vaccine : न्यूमोनिया लसीचा ठाण्यात ठणठणाट

बालकांना वयाच्या दीड महिने, तीन महिने व नऊ महिन्यांच्या अंतराने ही लस देण्यात येत असते. दुसरीकडे बालकांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाणारी न्यूमोनियाची लस मागील महिनाभरापासून ठाणे पालिकेकडे नसल्याची बाब समोर आली आहे.

टीम ॲग्रोवन

ठाणे : जन्मतःच बाळाचे न्यूमोकोकल न्यूमोनिया (Pneumococcal Pneumonia)आणि मेनिनजायटीसपासून (Meningitis) संरक्षण व्हावे, यासाठी लस दिली जाते. बालकांना वयाच्या दीड महिने, तीन महिने व नऊ महिन्यांच्या अंतराने ही लस (Pneumonia Vaccine) देण्यात येत असते. दुसरीकडे बालकांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाणारी न्यूमोनियाची लस मागील महिनाभरापासून ठाणे पालिकेकडे (Thane Municipality) नसल्याची बाब समोर आली आहे.

त्यामुळे पालिका हद्दीतील बालकांचे लस नसल्याने प्राणघातक आजारापासून संरक्षण कसे होणार, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.न्यूमोकोकल न्यूमोनिया आणि मेनिनजायटीसपासून संरक्षण होण्यासाठी तसेच बालकांचे आरोग्य चांगले रहावे, रोगप्रतिकारक शक्ती त्यांची उत्तम राहावी, यासाठी ही लस दिली जाते. यातील एक महत्त्वाची मानली जाणारी लस म्हणजे पीसीव्ही ही आहे. या लशीचे बालकांना डोस देण्यासाठी महापालिकेकडून मोहीमदेखील राबविली जात आहे.

ठाणे महापालिका हद्दीत दरवर्षी सुमारे ३० हजार नवीन बालके जन्माला येतात. त्यानुसार महिन्याला साधारणपणे दीड ते दोन हजार बालकांचे लसीकरण केले जात असते. परंतु ठाणे पालिकेच्या ३० पैकी एकाही आरोग्य केंद्रात पीसीव्ही लस उपलब्ध नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे पालिकाच नव्हे, राज्‍यातही तुटवडा ही परिस्थिती केवळ ठाणे पालिकेत नसून जिल्ह्यातील इतर महापालिका तसेच राज्यातील अनेक भागांमध्ये या लशीचा तुटवडा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आता ठाणे पालिकेने ज्या बालकांची ही लस चुकली असेल त्यांच्यासाठी आता सरकारकडून उपलब्ध होणाऱ्या साठ्यातून लस देण्याचा मानस व्यक्त केला आहे.दोन लसींचाही साठा नाहीचकेवळ पीसीव्ही नाही, तर पालिकेच्या आरोग्य केंद्रावर रोटा वायरस (जुलाबावरील) लस आणि आयपीव्ही (पोलिओ इंजिक्टेबल) या लसींचादेखील तुटवडा असल्याची माहिती समोर आली आहे;

परंतु त्या कमी-अधिक प्रमाणात असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. स्वाइन फ्लूची रुग्णसंख्या ५४१ वर मागील काही महिन्यांपासून शहरी भागासह ग्रामीण भागात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत होता. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात एकही स्वाईन फ्‍ल्‍यूच्‍या नव्या रुग्णाची नोंद झाली नसल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला होता.

मंगळवारी पुन्हा ठाणे पालिका हद्दीत नऊ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या ५४१ इतकी झाली आहे. ठाणे जिल्ह्यात कोरोनापाठोपाठ थैमान घालणाऱ्या स्वाइन फ्लू या आजाराने डोके वर काढल्याने आरोग्य यंत्रणा अधिक दक्ष झाल्या आहेत. त्यात या आजाराने १५ जणांचा बळी गेला आहे. त्यात पालिका क्षेत्रात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

Sangli Vidhansabha Election : सांगलीत भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; आर. आर. आबांच्या मुलाने वादळात दिवा लावला

Lumpy Skin Disease : दिघंचीमध्ये ‘लम्पी’चा विळखा

Agrowon Podcast : कांदा बाजारभाव दबावात; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत गहू दर?

SCROLL FOR NEXT