Over ₹4,300 Crore given to ineligible beneficiaries 
मुख्य बातम्या

पीएम किसानचे ४३०० कोटी चुकीच्या खात्यांत !

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan) संकेतस्थळावरही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासुविधेचा वापर करून एखादी व्यक्ती सहजपणे आपल्या खात्यांत चुकीने जमा करण्यात आलेली रक्कम सरकारकडे परत करू शकेल.

टीम अॅग्रोवन

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत (PM Kisan) ४३५२.४९ कोटी रुपयांहून अधिक रक्कम योजनेसाठी अपात्र नागरिकांच्या खात्यांत हस्तातंरित करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी लोकसभेत लेखी उत्तरादरम्यान दिली आहे.   

अपात्र नागरिकांना हस्तांतरीत करण्यात आलेले रक्कम योजनेतील एकूण लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या रक्कमेच्या २ टक्के असल्याचंही तोमर म्हणाले आहेत.  

या अपात्र नागरिकांच्या खात्यांत जमा केलेली रक्कम परत मिळवण्यासाठीची आदर्श अशी पद्धती अर्थात एसओपी (standard operating procedure) राज्यांकडे सोपवण्यात आली असून त्यानुसार हे पैसे परत मिळवण्यात येणार आहेत.  

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan) संकेतस्थळावरही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा वापर करून एखादी व्यक्ती सहजपणे आपल्या खात्यांत चुकीने जमा करण्यात आलेली रक्कम सरकारकडे परत करू शकेल. आजमितीस २९६.६७ कोटी रुपये अशा अपात्र नागरिकांकडून वसूल करण्यात आले असल्याची माहिती तोमर यांनी दिलीय. 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठीची पात्रता (PM Kisan) ही संबंधित शेतकऱ्यांच्या स्वयंघोषणा पत्र आणि राज्य/ केंद्रशासित प्रदेशांच्या छाननीनुसार निर्धारित करण्यात आली होती.   

व्हिडीओ पहा- 

नोंदणीसाठी काही गोष्टी अनिवार्य करण्यात आल्या आहेत. योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे पोहचवण्यासाठी थेट लाभार्थी हस्तांतरणाची (Direct Benefit Transfer) पद्धत अंगिकारण्यात आल्यापासून याविषयीची माहिती तपासण्यात यायला लागली आहे. आय कर, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, सात बारा नोंद आदींच्या आधारे लाभार्थ्याची खातरजमा करण्यात यायला लागल्याचे तोमर म्हणालेत. 

केंद्रशासित प्रदेश/ राज्यांनी दिलेल्या माहितीनंतरच निधी वितरित करण्यात येतो, त्यावेळीही आधार आयडेंटिफिकेशन (Adhar Identification)केले जात असल्याचे तोमर म्हणालेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Subsidy for Equipment: पन्नास टक्के अनुदानावर पंप, रोटाव्हेटर, कडबाकुट्टी

Solapur Water Shortage: सोलापुरात टंचाई निवारणासाठी ९.६७ कोटींचा कृती आराखडा

Drought Compensation: दुष्काळग्रस्तांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या : राष्ट्रवादी

Rabi Sorghum Seeds: रब्बी ज्वारीचे बियाणे १०० टक्के अनुदानावर

Fisheries Business: मत्स्य व्यवसाय विकासासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना

SCROLL FOR NEXT