संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

बीडमध्ये सव्वाशे क्विंटल तुरीचा गोलमाल

टीम अॅग्रोवन

बीड : हमीभावाने खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या १२१ क्विंटल तुरीचे तीन महिन्यांपासून पैसे तर दिलेच नाहीत, उलट पैशाची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच गुन्हे नोंद करण्याची नोटीस देण्याचा प्रताप बीड जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेने केला आहे. दरम्यान, या प्रकरणी आमदार अमरसिंह पंडित यांच्या पाठपुराव्यानंतर चौकशीचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत.

मागच्या हंगामात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर खरेदीचा प्रश्‍न जटील झाला. चोहोबाजूने मागणी आणि सरकार विरोधात टीका झाल्यानंतर शासनाने नाफेडमार्फत हमीभावाने तूर खरेदी केली. जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनमार्फत ही खरेदी झाली.गेवराईच्या बाजार समितीत बीड जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेमार्फत खरेदी केंद्र उघडण्यात आले.

दरम्यान, पाचेगाव (ता. गेवराई) येथील शहादेव खरसाडे, गणेश खरसाडे, शकुंतला देशमुख, गणेश कापसे, नागनाथ कापसे, सुरेश दाभाडे, तुकाराम ननवरे या शेतकऱ्यांनी या खरेदी केंद्रावर तूर आणली. या शेतकऱ्यांनी १२१ क्विंटल तूर विकली. शेतकऱ्यांकडे तुरीसाठीचे टोकण, केंद्रावर विक्री केल्याचे पुरावे आदी सर्व गोष्टी आहेत. २० ते ३१ मेच्या दरम्यान या शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर तूर दिल्यानंतर त्यांना अजूनही या तुरीचे पैसेच मिळाले नाहीत, हे विशेष.

केंद्रावर विकलेल्या इतर शेतकऱ्यांना तुरीचे पैसे मिळाल्यानंतर वरील शेतकऱ्यांनी पैशासाठी पाठपुरावा केला; मात्र संस्थेच्या अधिकाऱ्यांनी पैसे देण्याऐवजी शेतकऱ्यांनाच गुन्हे दाखल करण्याची नोटीस दिली. मागील अनेक दिवसांपासून हे शेतकरी विविध कार्यालयांत खेटे घालत आहेत. दरम्यान, १२१ क्विंटल तुरीचे साधारण सहा लाख रुपये होतात. हा गोलमाल कोणत्या अधिकाऱ्याने केला, हे चौकशीनंतर उघड होणारच आहे.

आमदार पंडित यांच्या तक्रारीनंतर दखल संबंधित शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानंतर आमदार अमरसिंह पंडित यांनी मार्केटिंग फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे तक्रार केली. पैसे न देता गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्याचा प्रकार गंभीर असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या प्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी तालुका सहायक निबंधकांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश गुरुवारी (ता. १६) दिले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

SCROLL FOR NEXT