कृत्रिम पावसाचीही हालचाल मंदच
कृत्रिम पावसाचीही हालचाल मंदच 
मुख्य बातम्या

कृत्रिम पावसाचीही हालचाल मंदच

टीम अॅग्रोवन

सोलापूर : पावसाळी ढगांप्रमाणेच सोलापूर जिल्ह्यातील कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची हालचाल मंदावली आहे. भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेने (आयआयटीएम) याबाबत सुरू केलेल्या प्रक्रियेची कोणतीही माहिती जिल्हाधिकारी किंवा पालकमंत्र्यांना मिळालेली नाही. त्यामुळे या प्रयोगाच्या भवितव्याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे, पावसाने ओढ दिल्याने कृत्रिम पावसाची मागणी शेतकरी करीत आहेत.

कृत्रिम पावसाच्या भारतातील पहिल्या शास्त्रशुद्ध प्रयोगाला सोलापूर जिल्ह्यात सुरवात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने हा प्रकल्प हाती घेतला आहे. तीन वर्षांसाठीच्या प्रकल्पातील हे दुसरे वर्ष असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत हालचाली दिसून येत नाहीत. ढगात फवारणी करून कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी काही विमाने पुण्यात दाखल होणार होती. वेदर आणि क्‍लायमेट ‘वेदर फोरकास्टिंग’ आणि ‘क्‍लायमेट’ या दोन्हीचा विचार करून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचा निर्णय झालेला होता. ‘वेदर’ म्हणजे रोजचे तापमान, तत्कालीन स्थिती आणि ‘क्‍लायमेट’ म्हणजे त्या परिसरातील हवामानाची दीर्घकालीन स्थिती. सोलापूर जिल्ह्यातील दोन्हीही गोष्टी दुष्काळीच आहेत. मागच्या १५ वर्षांतील सरासरी पर्जन्यमानही चिंताजनकच आहे. म्हणून सोलापूर जिल्ह्यात कृत्रिम पावसाची गरज आहे. कृत्रिम पावसाची पांडेत मागणी पांडे (ता. करमाळा) परिसरातील छोटे-मोठे तलाव पूर्ण आटले आहेत. जनावरांचा चारा संपला आहे. पिण्याच्या पाण्यासाठीही भटकंती करावी लागत आहे. महिना झाला तरी पावसाचा पत्ता नाही. खरीप पिकांचा पेरणी हंगाम कालावधी संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शासनाने कृत्रिम पाऊस पाडावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

SCROLL FOR NEXT