Narendra Modi
Narendra Modi 
मुख्य बातम्या

मोदीजी खुर्ची वाचवण्यासाठी खोट बोलतात: राहुल गांधी

टीम अॅग्रोवन

वाराणसी : नरेंद्र मोदीजी म्हणतात की मी हिंदू धर्माचे संरक्षण करतो. मोदीजी आपण खोटं बोलू नका. आपण शेतकरी, मजुरांसाठी नाही तर आपली खुर्ची वाचवण्यासाठी खोट बोलतात आणि असत्याला साथ देतात, असा आरोप कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला. 

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) गुरुवारी वाराणसीला पोचले . सरचिटणीस प्रियांका गांधी या निवडणुकीमुळे दोन दिवसांपासून वाराणसीत तळ ठोकून आहेत. आज गांधी भावंडांनी एक किलोमीटर पायी चालत काशी विश्‍वनाथाचे दर्शन घेतले. त्यांनी पूजा केली. त्यानंतर पिंडरा विधानसभेच्या(Legislative Assembly) प्रचारासाठी फुलपूरकडे रवाना झाले. येथील सभेत बोलताना राहुल म्हणाले, की सध्या आपले पंतप्रधान रोजगार, नोकरी आणि पंधरा लाखांची गोष्ट का करत नाहीत? आपल्या खात्यात पंधरा लाख रुपये येतील, असे आपण कधीही म्हणणार नाही. कारण मी तुमच्यासारखे खोटं बोलू शकत नाही. ते म्हणतात, की आम्ही परकीय आहोत. आमचे कुटुंब अलाहाबादचे आहे. मोदी यांनी एकदा मगरीशी लढाई केल्याचे मी ऐकले आहे. परंतु आपण पाहिले की ते जेव्हा गंगा नदीत उतरले तर त्यांना पोहता देखील येत नव्हते. तुम्हाला चांगले वाटो किंवा न वाटो, आपल्याला उत्तर प्रदेशात रोजगार मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. आपण आपल्या मुलांना कॉलेज, विद्यापीठात पाठवता. शिक्षणाचा खर्च खिशातून करतो. मुलांना शिक्षण दिले की त्याला नोकरी मिळेल, असे आपल्याला वाटत असते. परंतु सध्याची स्थिती पाहता रोजगाराची स्थिती चिंताजनक आहे.

 --

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT