Cotton and Soybean 
मुख्य बातम्या

सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा, विदर्भातील आजचे बाजारभाव

विदर्भ आणि मराठवाड्यातील आजचे सोयाबीन आणि कापसाचेबाजारभाव वाचा थोडक्यात.

टीम ॲग्रोवन

विदर्भ सोयाबीन बाजारभाव (vidarbha soybean rates) - कारंजा बाजारात आज सोयाबीनची 4700 क्विंटल आवक झाली. आवक झालेल्या सोयीबनला किमान 5725 रुपये तर कमाल 6275 रुपये दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 6050 हजार रुपयांवर होता. तर नागपूर बाजारात सोयाबीनची 640 क्विंटल आवक झाली असून किमान भाव 5000 रुपये होता. तर कमाल भाव 6300 रुपयांचा मिळालाय. या मालाला सर्वसाधारण 5935 चा भाव मिळालाय. तसंच NCDEX वरील माहितीप्रमाणे अकोला केंद्रावर FAQ दर्जाच्या सोयाबीनला आज 6,565 रुपयांचा भाव मिळालाय. तर त्याचबरोबर नागपूर केंद्रावर 6,666 रुपयांचा दर  मिळाल्याचं NCDEX च्या वेबसाईटवरून कळतं.

मराठवाडा सोयाबीन बाजारभाव (marathwada soybean rates) - लातूर बाजारात आज सोयाबीनची 15070 क्विंटल आवक झाली. आवक मालाला किमान 5101 रुपये तर कमाल 6490 रुपये दर मिळालाय. आणि सर्वात जास्त व्यवहार 6350 रुपयांनी झालेत. तर भोकर बाजारात आवक मालाला किमान 4809 तर कमाल 5950 रुपयांचा दर मिळालाय. इथं सर्वसाधारण दर 5380 रुपयांचा राहिलाय. दुसरीकडे अंबेजोगाई बाजारात सोयाबीनच्या आवक मालाला किमान 6176 रुपये तर कमाल 6340 रुपयांचा दर होता. तर सर्वसाधारण दर 6250 चा होता.

विदर्भ कापूस बाजारभाव (vidarbha cotton rates) - आज देऊळगाव राजा बाजारात कापसाची 2500 क्विंटल आवक झालीये. आवक मालाला किमान 9500 तर कमाल 9980 रुपयांचा दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 9700 चा होता. त्याचबरोबर पारशिवनी बाजारात कापसाची आज 550 क्विंटल आवक झाली. आवक मालाला 8800 रुपयांचा किमान तर 9980 चा कमाल भाव राहिलाय. तसंच सर्वसाधारण भाव 9800 रुपये होता.

मराठवाडा कापूस बाजारभाव (marathwada cotton rates) -  आज परभणी बाजारात कापसाची फक्त 980 क्विंटल आवक झाली. आवक मालाला किमान 8640 तर कमाल 10050 रुपयांचा दर मिळालाय. तसंच सर्वसाधारण दर 10035 चा होता. तर हिंगोली बाजारात आलेल्या 50 क्विंटल कापसाला 9650 ते 9800 रुपयांचा भाव देण्यात आला. या मालाचा सर्वसाधारण भाव 9725 रुपये होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hailstorm Crop Damage: मराठवाड्यात गारपिटीचा साडेअकरा हजार हेक्टरवर फटका

Farmer Dignity: शेतकऱ्याला सन्मान मिळेपर्यंत आमचा लढा: राजू शेट्टी

Grape Crop Damage: द्राक्ष बागांच्या नुकसानीची मंत्री शेलार यांच्याकडून पाहणी

Book Review: राजकीय अर्थव्यवस्थेतील बदलांचा आरसा

Global Energy Crisis: ऊर्जा स्वावलंबनाचे आव्हान...

SCROLL FOR NEXT