संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

स्मार्ट ग्राम योजनेस आर. आर. पाटील यांचे नाव : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

टीम अॅग्रोवन

मुंबई   : ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेस आता ‘आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना’ असे नाव देण्यात येत असल्याची घोषणा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी (ता. २७) विधानसभेत केली.

ग्रामविकास विभागातर्फे नोव्हेंबर २०१६ पासून राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात येतात. ही योजना आता ‘आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना’ म्हणून राबविली जाईल. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांनी ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. तसेच, त्यांनी राज्यात ग्रामस्वच्छता अभियान आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना सुरू करून त्या प्रभावीपणे राबविल्या. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन स्मार्ट ग्राम योजनेस त्यांचे नाव देण्यात येत असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.

गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता देण्यात आली. या पुरस्काराचे वितरण दरवर्षी आर. आर. (आबा) पाटील यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजे १६ फेब्रुवारीला जिल्हास्तरावर संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री किंवा जिल्ह्यातील मंत्री किंवा जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते केले जाईल, अशी माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

Agriculture Share : शेती निम्म्या हिश्‍शाने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल

Orchard Cultivation : ‘मनरेगा’अंतर्गत फळबाग लागवडीत कृषी विभाग अव्वल

Agrowon Sanvad : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करावी

SCROLL FOR NEXT