संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

अकोला कृषी विद्यापीठाने ‘प्रमोटेड कोविड १९’ शिक्क्याबाबत मागवला अहवाल

टीम अॅग्रोवन

अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संलग्न अमरावती येथील श्री शिवाजी हॉर्टीकल्चर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सेमिस्टर निकालाच्या गुणपत्रिकेवर‘प्रमोटेड कोविड १९’ असा मुद्रित शिक्का मारल्या प्रकरणाची कृषिमंत्री दादा भुसे यांनी दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानेही तातडीने संबंधितांकडून अहवाल मागविला असून त्यानंतरच पुढील कार्यवाही निश्चित केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

श्री शिवाजी महाविद्यालयाने हॉर्टीकल्चर अभ्यासक्रमाच्या विविध सत्रांच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले आहेत. ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे यंदा परीक्षा झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जो निकाल तयार करण्यात आला त्यावर ‘प्रमोटेड कोविड १९’ असा शेरा मुद्रित करण्यात आला होता. यावर अनेकांनी  आक्षेप घेत निषेध नोंदविला. या प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले.  

कृषिमंत्री भुसे यांनी  चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेला दिले. याबाबत कृषी विद्यापीठानेही तातडीने संबंधितांकडून अहवाल मागविला आहे. हा अहवाल आल्यानंतर त्याचा सविस्तर इतिवृत्तांत कृषिमंत्र्यांना सादर केला जाईल.  या प्रकरणात नेमकी चूक कोणी केली, निकालावर असा शेरा मारण्याबाबत कुणाचे निर्देश होते हे चौकशी अहवालातून समोर येणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT