संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

मंत्रालयातील सरकारी बैठकांवर निर्बंध

टीम अॅग्रोवन

मुंबई  : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच इतर कार्यालयांनी बैठका आयोजित करू नयेत, असे आदेश सामान्य प्रशासन विभगाने गुरुवारी (ता. १९) जारी केले आहेत. त्यामुळे मंत्रालयातील सरकारी बैठकांवर निर्बंध आले आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मंत्रालयात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच, मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्क्यांवर आणली आहे. आता मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच त्यांच्या अखत्यारीतील कार्यालयांनी शक्यतो बैठकांचे आयोजन करू नये. गरज असेल तरच महत्त्वाच्या बैठका आयोजित कराव्यात. तसेच, विषाणूचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टिकोनातून बैठकीला उपस्थित राहणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचा एकमेकांशी संपर्क होणार नाही अशाप्रकारे एक आसन सोडून पुरेसे अंतर ठेवण्याची दक्षता घ्यावी, अशी सूचना सामान्य प्रशासन विभागाने केली आहे.   राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष दरम्यान, कोरोना विषाणूमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर ६०३ क्रमांकाच्या दालनात राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष उघडण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाची जबाबदारी अतिरिक्त मुख्य आयुक्त राजीव जलोटा, प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT