गणपतीपुळे येथे मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
गणपतीपुळे येथे मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे 
मुख्य बातम्या

कोकणासह नवा महाराष्ट्र घडवूया : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी  ः आकडा सांगण्यापेक्षा कृतीला महत्त्व देणारे आपले सरकार आहे. त्यामुळे जी कामे करायची आहेत, त्याचे आपण आराखडे सादर करावेत. निधी कमी पडू दिला जाणार नाही. गणपतीपुळेच नव्हे तर कोकणासह नवा महाराष्ट्र घडवायचे काम आपण सर्वजण मिळून करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

गणपतीपुळे येथील १०२ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन सोमवारी (ता. १७) मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री ॲड. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, खासदार विनायक राऊत, आमदार हुस्नबानू खलिफे, राजन साळवी, भास्कर जाधव, शेखर निकम, रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आदी उपस्थित होते.  

या वेळी खासदार विनायक राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. कोकणचा विशेषत: तळकोकणचा विकास जलद गतीने व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री ॲड. अनिल परब आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची या वेळी भाषणे झाली.  

समारंभापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सहकारी मंत्री व पदाधिकाऱ्यांसह येथील गणपती मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या हस्ते येथील मंदिर परिसर विकासाचे भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण झाले. आराखड्याचा मुख्य भूमिपूजनाचा सोहळा आठवडा बाजारालगत असलेल्या रस्त्याच्या कामाने झाला. येथेही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण झाले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT