वक्फ बोर्डाच्या कार्यालयात मागण्यांबाबत निवेदन देताना किसान सभेचे पदाधिकारी व सदस्य.  
मुख्य बातम्या

इनाम, वक्फ बोर्डाच्या जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करा ः किसान सभा

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने इनाम जमिनी, वक्फ बोर्डाच्या जमिनी व गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करा या मागणीसाठी औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शुक्रवारी (ता.१३) राज्यव्यापी दिवाबत्ती आंदोलन करण्यात आले.

या वेळी किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जे.पी.गावीत, अध्यक्ष किसन गुजर, सरचिटणीस डॉ. अजित नवले, कोषाध्यक्ष उमेश देशमुख, राज्य कौन्सिल सदस्य भगवान भोजने यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. 

आंदोलनादरम्यान किसान सभेच्या शिष्टमंडळाने वक्फ बोर्डाच्या कार्यालयाकडे निवेदन सादर केले. डॉ. नवले म्हणाले, की ‘‘वक्फ बोर्डाचे सीईओ व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशीही भ्रमणध्वनीवरून संवाद साधला गेला. वक्फ बोर्ड लवकरच आंदोलकांच्या मागण्यांच्या अनुषंगाने बैठक बोलावणार असून इनामी जमिनी संदर्भात महसूल मंत्र्यांनीही वेळ देण्याचे व सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. या आंदोलनाची शासन व प्रशासनाने दखल न घेतल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन केले जाईल, असेही आंदोलना वेळी किसान सभेकडून स्पष्ट करण्यात आले.’’  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India Soybean Price: सोयाबीनच्या तेजीमागे दुष्काळ की साठेबाजी ?

Indian Politics: ‘एसआयआर’विरोधी आंदोलन निर्णायक वळणावर

Torrent Project Controversy: ‘टोरंट’ वादळ

Sugarcane Price Announcement: ऊसदर जाहीर करा, अन्यथा राजकीय नेत्यांना गावबंदी; ऊसदर संघर्ष समितीचा इशारा

Swabhimani Motorcycle Rally: ऊसदरासाठी ‘स्वाभिमानी’चे शक्तिप्रदर्शन; मोटारसायकल रॅलीमध्ये हजारो शेतकऱ्यांचा सहभाग

SCROLL FOR NEXT