Vidhan Bhavan Agrowon
मुख्य बातम्या

Monsoon Session : शासनाच्या निर्णयात स्पष्टता नसल्यामुळे दूधाला पूर्वीपेक्षा कमी दर ; राम शिंदेंचा सरकारला घरचा आहेर

Monsoon Session of Maharashtra Assembly 2023 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दूधाच्या खरेदी दरात कपात होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत असल्याने विरोधकांसोबत भाजपचे आमदार राम शिंदेंनी सरकारला घरचा आहेर दिला.

Team Agrowon

Maharashtra Monsoon Assembly Session 2023 : उत्पादन खर्च व दुधाला मिळालेला भाव यात ताळमेळ बसत नसल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागत आहे. गायीच्या दूधाला प्रतिलिटर किमान ३४ रूपये भाव देण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला. परंतु शासन निर्णय सुस्पष्ट नसल्याने दूधाला पूर्वीपेक्षा कमी दर मिळत आहे, अशी शब्दात भाजपचे आमदार राम शिंदे यांनी सरकारचे लक्ष वेधले.

राज्यात हिरवा व कोरडा चारा तसेच पशु खाद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. खर्चाच्या तुलनेने दुधाला किमान ३५ ते ४० रुपये भाव मिळावा, अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांमधून होत होती. यासाठी राज्य सरकाराने मागील आठवड्यामध्ये गायीच्या दूधाला प्रतिलिटर किमान ३४ रूपये भाव देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आजही अनेक दूध डेअरी आणि संघांकडून दूधाच्या खरेदी दरात कपात करून दूध उत्पादक शेतकऱ्यांची लूट करत आहेत. याप्रश्नावर विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांनी सरकार टीका केली. त्यावेळी सत्ताधारी बाकावरील भाजपच्या आमदारांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली.

राम शिंदे म्हणाले, दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च विचारात घेऊन, दूधाला रास्त भाव मिळावा, यासाठी शासनाने ३४ रुपये प्रतिलिटर दूध दर निश्चित केले आहेत. परंतु शासन निर्णयामध्ये स्पष्टता नसल्याने त्याचा दूध संघ आणि डेअरीकडून गैरफायदा घेतला जात आहे. 3.5/8.5 या गुणप्रतिच्या आधारावर दूध संघांनी प्रति पाॅईटला १ रुपया कमी करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना २९ ते ३० रुपये प्रति लिटर दूधाला भाव मिळत आहे. शेतकरी पूर्वीपेक्षा कमी दरात दूधाची विक्री करून तोटा सहन करत आहेत. यासाठी सरकारने शासन निर्णयामध्ये दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कृषिमंत्र्यांना १५-२० दिवसात चमत्कार झाला. त्यांनी विरोधी बाकावर असताना आणि सत्ताधारी बाकावर गेल्यावर आपल्या भूमिका बदलल्या आहेत. पण दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याबाबत भूमिका स्पष्ट केली नाही. शासन निर्णयामध्ये दुधाच्या दरासंबंधी स्पष्टता नसल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. सरकारने दूध उत्पादकांना प्रोत्साहन दिल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT