Summer Crop
Summer Crop 
मुख्य बातम्या

उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के वाढीचे उद्दिष्ट

टीम ॲग्रोवन

केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (Summer Crop) लागवड क्षेत्र वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी उन्हाळी पिकांची पेरणी २९ टक्क्यांनी वाढवून ५२.७२ लाख हेक्टर क्षेत्रावर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये २१.०५ लाख हेक्टर कडधान्य, १३.७८ लाख हेक्टर तेलबिया आणि १७.८९ लाख हेक्टर क्षेत्र भरड धान्याखाली  (Coarse Cearals) असणार आहे.   गेल्या उन्हाळी हंगामात धानाच्या (paddy) लागवडीखालील क्षेत्र सुमारे ४० लाख हेक्टर इतके होते आणि यावर्षी ते ३० ते ४० लाख हेक्टरच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. उन्हाळी तांदूळ प्रामुख्याने पश्चिम बंगाल, तेलंगणा, कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, तामिळनाडू आणि बिहारमध्ये घेतला जातो.  जाते. तर कडधान्यांमध्ये मूग (Moong) सर्वात जास्त पसंतीचे पीक असून सरकारने उन्हाळी मुगाखालील क्षेत्र १७.५८ लाख हेक्टर ठेवले आहे.  मागील वर्षी प्रामुख्याने मध्य प्रदेश, बिहार, ओडिशा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये मुगाचे क्षेत्र १४.४५ लाख हेक्टर होते. तेलबियांमध्ये (Oil Seed) प्रामुख्याने उन्हाळी भुईमूग आणि तीळाचे अनुक्रमे ७.६ लाख आणि ५.२५ लाख हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. तर भरड धान्यांपैकी मकाचे लक्ष्य मागील वर्षीच्या ७.८५ लाख हेक्टरच्या तुलनेत  यंदा ८.७९ लाख हेक्टर ठेवण्यात आले आहे. मान्सूननंतर देशात ऑक्टोबर डिसेंबर दरम्यान १७७.७ मिमी सरासरीपेक्षा ४४ टक्के जास्त पाऊस झाला आहे आणि जानेवारीच्या पहिल्या तीन आठवड्यात सरासरीच्या ३१.८ मिमीपेक्षा तीन पट जास्त पाऊस झाला आहे.   उन्हाळी हंगाम परिषद - २०२१-२२ च्या उन्हाळी हंगामासाठी कृषीसंबंधीत राष्ट्रीय परिषदेत बोलताना केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, मागील पीक हंगामातील पीक कामगिरीचा आढावा आणि मूल्यांकन करणे आणि राज्य सरकारांशी सल्लामसलत करून उन्हाळी हंगामासाठी पीकनिहाय लक्ष्य निश्चित करणे हा या परिषदेचा उद्देश होता. मोठ्या प्रमाणात आयात करावी लागत असल्याने तेलबिया आणि कडधान्यांचे उत्पादन वाढवणे हे सरकारचे प्राधान्य आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

Baramati Lok Sabha Election : नणंद की भावजय, कोण मारणार बाजी

Water Scarcity : नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती

Sugar Industry : साखर उद्योग सौरऊर्जा निर्मितीत येणार

Summer Sowing : उन्हाळी पेरणी क्षेत्रात नऊ हजार हेक्टरने घट

SCROLL FOR NEXT