संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सांगलीतील तूर खरेदी मर्यादेची कोंडी फुटणार का ?

टीम अॅग्रोवन

सांगली ः तूर खरेदी मर्यादेचा प्रश्न आता गुंतागुंतीचा होऊ लागला आहे. गेल्या नऊ दिवसांपासून शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेली तूर मंगळवारीदेखील खरेदी केंद्रात पडून होती. तूर खरेदीचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. तूर खरेदी मर्यादेची कोंडी फुटणार का, असा सवाल शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.   

जिल्ह्यात तूर खरेदी केंद्र सुरू होऊन नऊ दिवस झाले. तूर खरेदीची मर्यादा हेक्टरी २५७ किलो निश्चित केल्याने तूर विक्री न करता केंद्रातच पोती ठेवून शेतकरी गावाकडे निघून गेले आहेत. तूर खरेदीची मर्यादा वाढली की नाही, याची चौकशी शेतकरी सातत्याने करीत आहेत. परंतु खरेदीची मर्यादा वाढविण्याबाबत अद्यापही कोणताही निर्णय झालेला नाही, असे उत्तर हमीभाव केंद्रातून मिळत आहे. वास्तविक पाहता पाच दिवसांचे गाडी भाडे शेतकऱ्यांनाच द्यावे लागले. आता खरेदी केंद्रात ठेवलेल्या तुरीची देखभाल कशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  

सांगली जिल्ह्यात तूर पिकाची उत्पादकता वाढली असल्याचे अधिवेशनात पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कबूल केले आहे. मग खरेदी करताना उत्पादकता वाढवण्यासाठी का प्रयत्न होत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत मंत्री पाटील म्हणाले, की सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातच तुरीचे उत्पादन होते. मुळात हा प्रश्न पणन व कृषी विभागाशी निगडित आहे. गेल्या पाच वर्षांची सरासरी उत्पादकता लक्षात घेऊन खरेदी मर्यादा निश्चित केली आहे. मात्र, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने ठोस पाऊले उचलावीत, अशी मागणी कायम आहे.

तूर विक्रीबाबत पहिल्या टप्प्यात ३५ शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे संदेश पाठविले होते. परंतु खरेदी मर्यादा कमी असल्याने तूर खरेदी ठप्प आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना संदेश पाठविण्याचे काम थांबविण्याचा निर्णय खरेदी केंद्र चालकांनी घेतला आहे. तूर खरेदीची मर्यादा वाढवण्याची प्रतीक्षा हे केंद्रही करीत आहे.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा अंदाज; पावसासोबतच राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका कायम

Fodder News : विक्रीसाठी चारा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करा; पशुसंवर्धन आयुक्तांचे आदेश

Agriculture Land : नसलेल्या जमिनीचा शोध!

Crop Management : जमीन, पाऊसमानानुसार करा कोरडवाहू पिकाचं नियोजन

Watermelon Cultivation : प्रयोगशीलता जपत केली खरबूज लागवड

SCROLL FOR NEXT