नाशिक येथील आढावा बैठकीत बोलताना कृषिमंत्री दादा भुसे
नाशिक येथील आढावा बैठकीत बोलताना कृषिमंत्री दादा भुसे 
मुख्य बातम्या

कामाच्या माध्यमातून दिसावे कृषी विभागाचे प्रतिबिंब : कृषिमंत्री दादा भुसे

टीम अॅग्रोवन

नाशिक  : विशिष्ट शेतकऱ्यांसाठीच कृषी विभाग काम करतो, असा आरोप होतो. कामामध्ये सर्वसामान्य गरजू शेतकऱ्यांची संख्या कमी असते, हे चित्र बदलायला हवे. तळागाळातील शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना योजनांचा लाभ देऊन कामाच्या माध्यमातून कृषी विभागाचे प्रतिबिंब दिसायला हवे, असे प्रतिपादन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.

नाशिक विभागीय कृषी आढावा बैठकीचे शुक्रवारी (ता. १४) आयोजन करण्यात आले होते. या वेळी मंत्री भुसे बोलत होते. कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुहास दिवसे, फलोत्पादन संचालक श्री. जमधडे, प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे या वेळी उपस्थित होते. 

श्री. भुसे म्हणाले, की शेतकऱ्यांच्या अपेक्षांची पूर्ती व्हावी आणि कर्मचाऱ्यांच्या कामात गती यावी, यासाठी डिजिटलायझेशनवर भर देण्यात येईल. कृषी विभागाच्या प्रगतीचा आलेख उंचावत असला तरी दुसरीकडे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत ही गंभीर बाब आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सामूहिकरीत्या काम करावे.

या वेळी श्री. डवले म्हणाले, की पीक उत्पादकता वाढीसोबत शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. कृषी विभागातील कार्यरत घटकांनी स्वतःच्या शेतात प्रयोग राबवून गाव व परिसरातील शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरेल असे काम करून दाखवावे.

कृषी आयुक्त श्री. दिवसे म्हणाले, की नव्या तयार होणाऱ्या आकृतिबंधात कामकाजाची गुणवत्ता सुधारताना स्पेशलायझेशनवर भर दिला जाईल. त्यात कामांच्या जबाबदाऱ्या निश्चित करताना कृषी अर्थशास्त्र केंद्रित काम करण्याच्या विभागाला सूचना केल्या आहेत. या वेळी प्रयोगशील शेतकरी व उत्कृष्ट काम करणाऱ्या कृषी कर्मचाऱ्यांचा सन्मान कृषिमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. 

ग्रामविकासासारखे मॉडेल राबवा ग्रामविकासासारखे कृषी विकासाचे मॉडेल विकसित करून कृषी व संलग्न विभाग एकाच छताखाली जिल्हा व तालुका स्तरावर एकत्रित आणून शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा देणे सोईस्कर होईल, अशी सूचना या वेळी कृषी अधिकऱ्यांनी मांडली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Market : आळेफाट्याच्या बाजारात १६५ गायींची विक्री

Urea Racket : युरिया रॅकेटविरोधात अखेर गुन्हा दाखल

Jowar Market : हमीभावापेक्षा कमी दराने विकतेय ज्वारी

Bhavantar Yojana : भावांतर योजनेचे गाजर

Tur Market : विदर्भातील बहुतांश बाजारांत तूरदर दबावात

SCROLL FOR NEXT