संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

टेंभू उपसा सिंचन योजनेचे १९ पंप सुरू

टीम अॅग्रोवन

सांगली  ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे १९५० अश्वशक्तीचे १९ पंप सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील पाणीप्रश्न मार्गी लागणार असून सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पट्ट्यातील कडेगाव तालुक्यासह खानापूर, आटपाडी तालुक्यात पूर्व भागातील अनेक लघुपाटबंधारे तलाव, बंधारे यासह अनेक विहिरी पाण्याअभावी कोरड्या पडल्या आहेत. तालुक्यातील या भागातील हजारो शेतकऱ्यांना जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी टेंभू उपसा सिंचन योजनचे पाणी सुरू करण्याची मागणी केली होती.

तांत्रिक अडचणीमुळे टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे पहिले आवर्तन चार महिने उशिरा सुरू झाले. टेंभू उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सुरू झाले होते. मात्र, केवळ मुख्य पंपगृहातील दोनच पंप सुरू करून दुष्काळग्रस्त भागात पाणी सोडले जात होते. त्यामुळे हे पाणी कडेगाव तालुक्यातपर्यंत आले नव्हते. त्यामुळे दुष्काळग्रस्त पट्ट्यातील शेतकऱ्यांनी योजनेचे अधिक पंप सुरू करून पाणी द्या, अशी मागणी केली होती. 

दरम्यान टेंभू उपसा सिंचन प्रकल्प योजनेचे एकूण १९ पंप सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे पाणी आता जलद गतीने दुष्काळग्रस्त पट्ट्यात पोचण्यास मदत होणार असल्याने शेतकऱ्यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे. ‘टेंभू’च्या या आवर्तनातून लाभक्षेत्रातील सुमारे ४० हजार हेक्टरवरील पिकांना जीवदान मिळणार आहे.   ‘लहान, मोठे तलाव भरून द्या’ मुळात योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरू होण्यास विलंब झाला आहे. आता पूर्ण क्षमतेने योजना सुरू झाली नसली, तरी १९ पंपांद्वारे पाणी सोडले जात आहे. त्यामुळे पाणी लवकर मिळेल. पण दोन महिन्यांनी पुन्हा पाणी टंचाई निर्माण होऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाने लाभ क्षेत्रातील लहान, मोठे तलाव भरून द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT