गिन्नी गवतावर झालेला नाकतोड्यांचा प्रादुर्भाव
गिन्नी गवतावर झालेला नाकतोड्यांचा प्रादुर्भाव 
मुख्य बातम्या

कोपरगाव तालुक्यात गिन्नी गवतावर नाकतोड्यांचा प्रादुर्भाव

सुर्यकांत नेटके

नगरः नगर-नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वडगाव बक्तरपूर (ता. कोपरगाव) येथे गिन्नी गवतावर नाकतोड्यांचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यांनी गिन्नी गवताचा फडशा पाडला असल्याचे सोमवारी (ता.१) आढळून आले. याबाबत शेतकऱ्यांनीच कृषी विभागाला माहिती दिली असून तालुका कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून हे नाकतोडे असल्याचे सांगितले. नगर, नाशिक जिल्ह्यातही त्यांचा धोका वाढला असून या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सोमवारी कोपरगाव तालुक्यातील वडगाव बक्तरपूर येथील दशरथ डोंगरे यांच्या शेतातील गिन्नी गवतावर रविवारी नाकतोडे आढळून आले. त्यांनी त्याची छायाचित्रे तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांना पाठवली. त्यानंतर आढाव यांनी संबंधित शेतकऱ्याच्या शेतीला भेट दिली. या नाकतोड्यांनी गिन्नी गवतावर हल्ला केल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता तर आहे. मात्र अन्य पिकांवरही धोका वाढू शकतो असा कृषी विभागाचा अंदाज आहे. काही नाकतोडे आकाराने मोठे तर काही लहान अवस्थेत असून ते स्थानिक भागातीलच असू शकतात अशी शक्यता व्यक्त झाली आहे.

घाबरून न जाता नियंत्रण करावे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सी.एस. पाटील म्हणाले, की शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. नगर कृषी विभागाकडून काही छायाचित्रे पाठवण्यात आली आहेत. त्यावरून ते नाकतोडे असल्याचे दिसते. सध्याच्या पावसाळी वातावरणात त्‍यांची संख्या कमी-जास्त प्रमाणात वाढू शकते. पाच टक्के निंबोळी अर्क किंवा कडुनिंबावर आधारीत अझाडिरेक्टिन (१५०० पीपीएम) या कीटकनाशकाची तीन मिली प्रति लीटर पाण्यातून फवारणी करावी. अधिक मार्गदर्शनासाठी विद्यापीठाचा सल्ला घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lemon Rate : लिंबाचे दर पोहोचले ६,५०० रुपयांवर

Hirda Picking : जुन्नर तालुक्यात हिरडा गोळा करण्याची लगबग

Yedgaon Dam Victim : येडगाव धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी धरणात पाणीसाठा राखून ठेवावा

Interview with PM Narendra Modi : आर्थिक विकासाची महाराष्ट्रासाठी ‘गॅरंटी’

Sugar Market : कोट्यापेक्षा जादा साखर विक्री कारखान्यांना पडली महागात

SCROLL FOR NEXT