संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

पोकरामधून मिळणार यांत्रिकीकरणासाठी अनुदान

टीम अॅग्रोवन

अकोला  ः राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये राबविल्या जात असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी  प्रकल्पांतर्गत (पोकरा) यांत्रिकीकरणासाठी अनुदान दिले जाणार आहे. शासनाने या प्रकल्पात कृषी यांत्रिकीकरण हा घटक समाविष्ट केला असून विविध यंत्रांसाठी अनुदान स्पष्ट केले आहे.

हवामान बदलामुळे शेतीवर मोठे परिणाम झालेले आहेत. यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाकडून जागतिक बॅंकेच्या अर्थसाहाय्यातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) राबविला जात आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश विभागातील १५ जिल्ह्यांचा यात समावेश आहे. विविध पातळ्यांवर योजनेची अंमलबजावणी केली जात असून शेतकऱ्यांकरिता वैयक्तिक लाभाच्या असंख्य योजना तयार करण्यात आल्या आहेत.

आता हवामान अनुकूल कृषी यांत्रिकीकरण या घटकाचाही समावेश योजनेत करून विविध यंत्रांसाठी अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.  प्रामुख्याने या प्रकल्पातून ट्रॅक्टर खरेदीसाठी दोन हेक्टर जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्याला किमतीच्या ५० टक्के किंवा १ लाख २५ हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती दिली जाईल. दोन ते पाच हेक्टर जमीन धारण असलेल्या शेतकऱ्यांना किमतीच्या ४० टक्के किंवा एक लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी येईल ती मिळू शकेल.

या यंत्रांसाठी मिळणार अनुदान ट्रॅक्टर, ट्रॅक्टर चलित यंत्रे, रोटाव्हेटर, पल्टी नांगर, बेड मेकर्स, स्वयंचलित यंत्रे, रिपर, नर्सरीसाठी लागणारी अवजारे, विविध प्रकारच्या पिकांची पेरणी, कापणी, मळणीसाठी वापरली जाणारी यंत्रे,  इंटर कल्टिव्हेशन इक्विपमेंट, शुगरकेन थ्रॅश कटर, स्ट्रॉ रिपर, स्टबल शेवर, थ्रेशर, मल्टीक्रॉप थ्रेशर, ओनियन हार्वेस्टर, पीक संरक्षणासाठी वापरले जाणारे मॅन्युअल स्पेअर्स (नॅपसॅक, फुट, बॅटरी ऑपरेटेड), पॉवर नॅपसॅक स्प्रेयर, काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणांमध्ये मिनी डाळमिल, मिलेट मिल, ऑईल मिल फिल्टर, सीताफळ पल्प काढणी यंत्र अशा विविध यंत्रांसाठी शेतकऱ्यांना अनुदानाच्या माध्यमातून पाठबळ मिळणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Market : आळेफाट्याच्या बाजारात १६५ गायींची विक्री

Urea Racket : युरिया रॅकेटविरोधात अखेर गुन्हा दाखल

Jowar Market : हमीभावापेक्षा कमी दराने विकतेय ज्वारी

Bhavantar Yojana : भावांतर योजनेचे गाजर

Tur Market : विदर्भातील बहुतांश बाजारांत तूरदर दबावात

SCROLL FOR NEXT