संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

पशुसंवर्धन अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही विमा संरक्षण देण्याची मागणी

टीम अॅग्रोवन

नगर  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी अत्यावश्यक सेवा देत आहेत. सगळीकडे लॉकडाउन असताना ग्रामीण व शहरी भागात पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून पाळीव जनावरांवर उपचार करीत आहेत. परंतु सुविधा व विमा संरक्षणापासून ते वंचित आहेत तरी याबाबी लागू कराव्यात, अशी मागणी नगर जिल्‍ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने केली आहे.

संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक हे आजारी पशुधनाचा जीव वाचविण्यासाठी पशुपालकांच्या दारात जाऊन सेवा उपलब्ध करून देत आहेत. तसेच पशुपालकांना स्वतःची व पशुची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन करीत आहे. हे सर्व करत असताना पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी अनेक व्यक्तींच्या संपर्कात येत आहेत ही बाब निवेदनात निदर्शनास आणून दिली असून या कर्मचाऱ्यांना पुढील ९० दिवसासांठी किमान एक कोटींचे विमा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. पशुंवरील उपचाराचे सेवाशुल्क नको लॉकडाउन असल्याने शेतमाल मातीमोल भावाने विकला जात असून दुधाचे दर कमी झालेले आहे. अशा परिस्थितीत पशुपालकांना पशुंवरील उपचाराचे सेवाशुल्क व कृत्रिम रेतनाचे सेवाशुल्क देणे अवघड झालेले आहे. पशुपालकांकडुन कोणतेच सेवाशुल्क आकारण्यात येऊ नये,अशीही मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Elephant Issue in Germany : हत्तींवरून दोन देशांमध्ये रणकंदन

Nainital forest fires : नैनितालच्या जंगलात आग; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्याचे मुख्यमंत्री धामी यांचे आदेश

The Economist : इकॉनॉमिस्टच्या नजरेतून दक्षिण व उत्तर भारत

Urja Bio System : शाश्‍वत ऊर्जेसाठी ‘ऊर्जा बायो सिस्टिम प्रा. लि.’ची साथ

Crop Insurance : पीकविम्याचे बदल शेतकऱ्यांच्या किती फायद्याचे?

SCROLL FOR NEXT