संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सोलापुरात मक्‍यावर अमेरिकन लष्करी अळीची चाल 

टीम अॅग्रोवन

सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात खरीपातील पिकांची पेरणी होऊन कुठे पंधरवडा, तर कुठे महिनाही उलटला नाही, तोच विविध कीड-रोगांची समस्या पुढे येऊ लागल्या आहेत. त्यात मक्‍यावरील अमेरिकन लष्करी अळी आघाडीवर आहे. सध्या या अळीने आपले पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. सध्या तिच्या प्रादुर्भावाचे क्षेत्र तुलनेने कमी म्हणजे २ ते ३ टक्‍क्‍यांपर्यंतच आहे. पण लवरकच ती सर्व क्षेत्र व्यापण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे. 

यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने सोलापूर जिल्ह्यात खरिपाची पेरणी जवळपास ९० टक्‍क्‍यांपुढे गेली आहे. मात्र, सध्या फक्त मक्‍यावरच लष्करी अळीचा प्रादुर्भाव आहे. खरिपातील प्रमुख पिकांमध्ये मक्‍याचाही समावेश प्राधान्याने करावा लागेल. जिल्ह्यात सगळीकडेच मक्‍याची कमी-अधिक पेरणी होतेच. पण माळशिरस, पंढरपूर, माढा, करमाळा या पट्ट्यात मक्‍याची सर्वाधिक पेरणी होते.

यंदाही कृषी विभागाने मक्‍यासाठी २६८. ५६ हेक्‍टरचे उद्दिष्ट घेतले. त्यापैकी जवळपास २३५.२२ हेक्‍टर (८८ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. प्रामुख्याने पावसाच्या वेळेवरील हजेरीमुळे पेरणी लवकर उरकली आहे. सध्या अनेक भागांत मका उगवते आहे, कुठे चांगली वाढली आहे. पण त्यावर आता अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. दक्षिण सोलापूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, माळशिरस, अक्कलकोटच्या काही भागात सध्या ही अळी आणि तिच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसत आहेत.  लष्करी अळीच्या प्रादुर्भावाबाबत शेतकऱ्यांकडून अद्याप तशी काही विचारणा झालेली नाही. पण काही ठिकाणी मक्‍यावर प्रादुर्भाव दिसून येत आहेत. सध्या फक्त सुरुवात आहे. वेळीच उपाय केले, तर कीड आटोक्‍यात येईल, असे कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ज्ञ अमोल शास्त्री यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT