संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

लासलगाव, विंचूर, निफाड वगळता जिल्ह्यात बहुतांश कांदा लिलाव बंद

टीम अॅग्रोवन

नाशिक  : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या खबरदारी पोटी लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय काही बाजार समित्यांनी घेतला आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मात्र, लासलगाव बाजार समितीचे कामकाज सोमवारी (ता.१३) मुख्य बाजार आवर, विंचूर व निफाड उपबाजारात कामकाज सुरू राहणार आहेत. 

जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये प्रामुख्याने लाल कांद्याची आवक अंतिम टप्प्यात असून उन्हाळ कांदा आवक सुरू झाली आहे. अशातच कोरोना संसर्गामुळे खबरदारी म्हणून बाजार समित्या पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समिती सुरू असल्याने उमराणे, चांदवड, मालेगाव या बाजार समित्या बंद असल्याने येथील आवक वाढली. अशातच मजूर टंचाई, वाढलेली गर्दी यामुळे नियोजन कोलमडल्याने बाजार समितीने कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. 

उमराणे बाजारात मालेगाव येथून मोठ्या प्रमाणावर मजूर येतात. अलीकडे मालेगाव येथे रुग्ण आढळल्याने येथील ग्रामपंचायतीने गर्दी टाळण्यासाठी कामकाजावर हरकत घेतली आहे. तर व्यापाऱ्यांनी असमर्थता दाखवल्याने कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ग्रामस्थ, ग्रामपंचायत, व्यापारी असोसिएशन यांची तहसीलदार पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत आज(ता.११) कामकाज सुरू ठेवण्याच्या संदर्भात बैठक होणार आहे.

नामपूर बाजार समितीत परिसरातून येणाऱ्या मजुरांना संबंधित गावांमधून मज्जाव होत असल्याने मजूर टंचाई आहे, त्यात व्यापाऱ्यांची असमर्थता असल्याने पुढील निर्णय होईपर्यंत लिलाव बंद राहणार आहेत.

या बाजार समित्या बंद पिंपळगाव बसवंत, चांदवड, उमराणे, नामपूर, सटाणा, मनमाड, माळेगाव, कळवण

अनिश्‍चित बाजार समित्या येवला, देवळा

प्रतिक्रिया  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी गुरुवार व शुक्रवार २०० वाहनांची मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यात परिस्थितीचा अंदाज घेऊन कांदा लिलाव सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  - भास्कर तांबे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, सटाणा 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कांद्याची आवक नियंत्रित करून खबरदारी घेत कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. यामध्ये मोबाइलद्वारे पूर्वनोंदणी करून बाजार समितीचे मनुष्यबळ व क्षेत्र विचारात घेता कामकाज करावे. कांदा हा अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असल्याने अशा परिस्थितीत त्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्यांनी योग्य ती खबरदारी घेऊन कामकाज करावे. - गौतम बलसाने, जिल्हा उपनिबंधक, नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

World Veterinary Day : मानवी आरोग्यातही पशुवैद्यकाचे बहुमूल्य योगदान

Agricultural Exports : खेळखंडोबा शेतीमाल निर्यातीचा!

Lok Sabha Election 2024 : टपाली मतदानास १,६६२ मतदारांची पसंती

Lok Sabha Election 2024 : सात हजार कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविण्यास सुरुवात

Banana Orchard Damage : सारी केळी भुईसपाट

SCROLL FOR NEXT