संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

पूर्व विदर्भात पावसाला पोषक हवामान

टीम अॅग्रोवन

पुणे  : राज्यात तापमानाचा पारा सातत्याने वाढतच आहेत. सोमवारी (ता.६) सोलापूर येथे यंदाच्या हंगामात आतापर्यंतच्या उच्चांकी ४१.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात उन्हाच्या चटक्यासह उकाडाही वाढण्याची शक्यता आहे. पोषक हवामान असल्याने पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.   

सोलापुरात तापमान चाळीशी पार असल्याने उन्हाचा ताप चांगला वाढला आहे. सोलापूरसह मालेगाव येथे उच्चांकी ४१.२ अंश सेल्सिअस, तर परभणी येथे ४०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरीत राज्यात बहुतांशी ठिकाणी तापमान ३६ ते ४० अंशांच्या आसपास आहे. उन्हाचा चटका वाढल्याने दुपारी घराबाहरे पडणे असह्य होत आहे.

राज्यात सर्वत्र दिवसाबरोबरच रात्रीही उकाडा कायम आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, शिरोळ तालुक्यासह विविध ठिकाणी वादळी वारा, गारपीटीसह पावसाने तडाखा दिला. सुमारे दिड तास झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले. नारळ, बदाम, बाभळीची झाडे उन्मळून पडली. तसेच विजेचे खांब उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. मराठवाडा आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. विदर्भापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. यामुळे पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सो मवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.३, जळगाव ३९.६, धुळे ३९.६, कोल्हापूर ३७.६, महाबळेश्‍वर ३२.२, मालेगाव ४१.२, नाशिक ३८.४, निफाड ३५.२, सांगली ३८.२, सातारा ३९.२, सोलापूर ४१.९, डहाणू ३२.८, सांताक्रुज ३३.२, रत्नागिरी ३२.०, औरंगाबाद ३७.६, परभणी ४०.६, अकोला ३९.६, अमरावती ३७.६, बुलडाणा ३६.२, ब्रह्मपुरी ३८.९, गोंदिया ३६.६, नागपूर ३७.६, वर्धा ३७.०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT