संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

तापमानात चढ-उतार शक्य

टीम अॅग्रोवन

पुणे  : उत्तरेकडील थंड वाऱ्याचा अभाव, ढगाळ हवामानामुळे राज्यात थंडीचा कडाका कमी झाला आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाडाही काहीसा वाढला आहे. शुक्रवारी (ता. १४) निफाड यथील गहू संशोधन केंद्रामध्ये राज्यातील नीचांकी ११.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या तापमानात चढ उतार शक्य असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांना अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. समुद्रावरून महाराष्ट्रात येणाऱ्या उष्ण व दमट वाऱ्यामुळे हवामान ढगाळ होत आहे. राज्याच्या सर्वच भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा २ ते ५ अंशांपर्यंत वाढ झाली आहे. राज्याच्या उत्तर भागात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित भागात चढ उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शुक्रवारी (ता. १४) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १५.० (३), नगर १५.५ (३), धुळे १२.०, जळगाव १३.२ (०), कोल्हापूर १९.५ (३), महाबळेश्‍वर १५.९ (२), मालेगाव १६.२ (५), नाशिक १५.५ (४), निफाड ११.६, सांगली १८.६ (३), सातारा १७.१ (३), सोलापूर १७.७ (०), अलिबाग २०.६ (३), डहाणू २३.४ (६), सांताक्रूझ २१.६ (४), रत्नागिरी २१.४ (२), औरंगाबाद १६.९ (३), परभणी १५.८ (०), नांदेड १४.० (-१), उस्मानाबाद १३.८ (-२), अकोला १५.० (-१), अमरावती १५.० (-२), बुलडाणा १६.४ (०), चंद्रपूर १४.८ (-२), गोंदिया १३.६(-२), नागपूर १२.९(-३), वर्धा १५.४ (१), यवतमाळ १५.०(-२).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT