संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढू लागली

टीम अॅग्रोवन

सातारा : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अडचणीत असलेल्या नागरिकांना आता पाणीटंचाईच्या झळा सोसण्याची वेळ आली आहे. माण, खटाव या दुष्काळग्रस्त तालुक्यांसह वाई, पाटण तालुक्यात सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पाणीटंचाईत वाढ होत असून टँकरची मागणी वाढली आहे.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र लॅाकडाउन सुरू आहे. जिल्ह्यात सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १४ वर गेली असल्याने प्रशासनाकडून लॅाकडाउन कडक करण्यात आले आहे. हे संकट सुरू असतानाच माण, खटाव या दुष्काळग्रस्त तालुक्यांसह वाई व पाटण तालुक्यात पाणीटंचाईचे संकट आहे. पिण्याची पाण्याची टंचाई भासत असल्याने प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

सध्या या चार जिल्ह्यांतील पाच गावे व दहा वाड्यावस्त्यांवरील चार हजार ८६१ नागरिकांना सहा टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यामध्ये माण तालुक्यातील एक गाव, पाच वाड्यावस्त्यांवरील ९५५ नागरिकांना एका टँकरद्वारे, खटाव तालुक्यातील एक गाव व एका वाडीवस्तीवरील १४१ नागरिकांना एका टँकरव्दारे, वाई तालुक्यातील एका गावातील एक हजार ४५५ नागरिकांना एक टँकरद्वारे तर पाटण तालुक्यातील दोन गावे व चार वाड्यावस्त्यांवरील दोन हजार ३०२ नागरिकांना तीन टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच खटाव, वाई व पाटण तालुक्यातील एक हजार ६३२ पशूधन पाणीटंचाईचा सामना करीत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT