शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून तयार केलेला पाणंद रस्ता.
शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून तयार केलेला पाणंद रस्ता. 
मुख्य बातम्या

वेणी बुद्रुक लोकवर्गणीतून तयार केला अडीच किलोमीटरचा पाणंद रस्ता

दिनकर गुल्हाने

पुसद, जि. यवतमाळ ः यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील वेणी बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीमार्फत शासनाकडे पाणंद रस्त्याचे प्रस्ताव दाखल केले. मात्र, रस्त्यांचे काम सुरू होऊ शकले नाही. मग शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून पाणंद रस्त्यांचे काम हाती घेतले. अन् पाहता पाहता आठ दिवसांत अडीच किलोमीटर लांबीचा प्रशस्त पाणंद रस्ता तयार झाला. ही किमया साधली ग्रामस्थांच्या एकजूट व गरजेतून.

गावखेड्यातील पाणंद रस्ते अरुंद व झाडाझुडपांनी वेढल्याने या रस्त्यावरून शेतीची मशागतीसाठी वाहतूक तसेच शेतमाल ने-आण करण्यासाठी मोठी अडचण होते. ही अडचण लक्षात घेऊन शासन पाणंद रस्ते विकास योजना राबवीत आहे. मात्र, यात काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतकरी बरेचदा आपल्या शेतातील पाणंद रस्त्यासाठी शेतजमीन द्यायला तयार होत नाही. अशा वेळी रस्त्यांचे काम रखडते. हाच प्रश्न वेणी गावातही समोर आला.

तालुक्यातील वेणी हे गाव भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहे. सुमारे ८० एकर क्षेत्रावर भाजीपाला घेतला जातो. परंतु, अरुंद पाणंद रस्त्यावरून बैलगाडीने भाजीपाला मुख्य रस्त्यावर आणणे शक्य नसल्याचे युवा शेतकऱ्यांच्या लक्षात आले. यावर शेतकऱ्यांनी विचारविनिमय करून लोकवर्गणीतून प्रशस्त पाणंद रस्ता तयार करण्याचे काम जानेवारी अखेरीस हाती घेतले. वेणी-वरवट शीव पाणंद रस्त्यासाठी ५८ लाभार्थी शेतकऱ्यांनी ३.३५ लाख रुपये लोकवर्गणी गोळा केली आणि पाहता पाहता झाडाझुडपांनी वेढलेला अरुंद पाणंद रस्ता २२ फूट रुंद झाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या तयार करण्यात आल्या. 

हा प्रशस्त पाणंद रस्ता तयार झाल्याने शेतकरी समाधानी आहेत. आता शेतातील भाजीपाला बाजारपेठेत नेण्यासाठी थेट वाहन शेताच्या बांधावर नेता येणार असल्याने भाजीपाला व्यवसाय तसेच दुग्ध व्यवसाय, रेशीम शेतीला चालना मिळणार आहे. यापुढे वेणी-दहिवड या पाचव्या पाणंद रस्त्याचे काम लोकवर्गणीतून करण्याचे शेतकऱ्यांनी ठरविले आहे.  

खडीकरण, डांबरीकरण करावे  लोकवर्गणीतून तयार करण्यात आलेल्या या पाणंद रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण शासनाने निधीतून करावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या वेळी शेतकरी रवींद्र पुंड, सुभाष खंदारे, रोहन राठोड, श्रीधर सुरोसे, त्र्यंबक पाटे, सुधाकर चापके, विकास सुरोसे, विजय सुरोसे, शिवाजी पाटे उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT