खटाव तालुक्यात रखरखत्या उन्हात कांदा काढणीची कामे सुरु आहेत
खटाव तालुक्यात रखरखत्या उन्हात कांदा काढणीची कामे सुरु आहेत 
मुख्य बातम्या

खटाव तालुक्यात रखरखत्या उन्हात कांदा काढणीस प्रारंभ

टीम अॅग्रोवन

बुध, जि.सातारा  : खटाव तालुक्‍याच्या उत्तरेकडील पट्ट्यात कांदा काढणीच्या कामांना वेग आला असून, रखरखत्या उन्हात मजूर व शेतकरी चार महिने अहोरात्र कष्ट करून तयार केलेल्या कांद्याच्या काढणीसाठी उन्हाच्या झळा सोसताना दिसत आहेत.  यावर्षी प्रतिकूल हवामानामुळे कांद्याच्या उत्पादनात सरासरी ३० टक्के घट झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

ग्रामीण भागात ३५ ते ४० अंश दरम्यान तापमान आहे. उन्हाच्या झळांनी अंगाची लाही-लाही होत असतानाही उत्तर खटाव परिसरातील शेतकरी मजूर व कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने कांदा काढणीत गुंतले आहेत. असह्य उकाड्यातही डिस्कळ, गारवडी, ललगुण, नागनाथवाडी, फडतरवाडी, बुध, काटेवाडी परिसरातील शेतकरी कांदा काढणीत व्यस्त आहेत. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने बोअरवेल व विहिरींना बऱ्यापैकी पाणी असल्यामुळे परिसरात चालू वर्षी कांदा लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.

मात्र, सततच्या ढगाळ वातावरणामुळे व पहाटे पडणाऱ्या दाट धुक्‍यामुळे कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने दरवर्षीच्या तुलनेत सरासरी उत्पादनात ३० ते ४० टक्के घट जाणवत असल्याचे सांगण्यात येत आहे.

एकीकडे तापमान वाढीमुळे व ‘कोरोना’च्या भीतीपोटी नागरिकांना घराबाहेर पडू नये, असे सांगितले जात असताना शेतकरी व मजूर वर्ग मात्र चार पैसे मिळावेत, यासाठी उन्हाच्या झळा सोसत कांदा काढणी करताना दिसत आहे. सध्या ‘कोरोना’मुळे बाजारपेठांवर मर्यादा आल्यामुळे बाजारभाव कमी असल्याने शेतकरी कांदा चाळींमध्ये साठवण्यावर भर देत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT