संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

नगरमधील अडीच लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात १४६४ कोटी वर्ग 

टीम अॅग्रोवन

नगर  : ‘कोरोना’चे संकट उभे असताना प्रशासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जिव्हाळ्याने लक्ष दिले आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आत्तापर्यंत नगर जिल्ह्यातील २ लाख ३९ हजार ४०६ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची १४६४ कोटी रुपये रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेंतर्गत सहकार विभागातर्फे ३ लाख ४६ हजार शेतकऱ्यांची नावे अपलोड करण्यात आली होती. त्यातील २ लाख ५३ हजार ४५५ शेतकरी यासाठी पात्र ठरले. त्यातील २ लाख ४७ हजार २०२ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांचे आधार प्रमाणिकरणही करण्यात आले. त्यानंतर ‘कोरोना’चे संकट आल्याने उर्वरित ६ हजार २३० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी राहिले आहे. मात्र, आधार प्रमाणीकरण झालेल्या २ लाख ३९ हजार ४०६ शेतकऱ्यां‍च्या कर्जखात्यावर १४६४ कोटींची रक्कम संबंधित बॅंकेकडे जमा करण्यात आली आहे. या योजनेचा नुकताच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत  आढावा घेण्यात आला.    ‘जनधन’, ‘शेतकरी सन्मान’मधूनही मिळणार रक्कम पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत जनधन खात्यामध्ये दरमहा पाचशे याप्रमाणे तीन महिन्यांत दीड हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात या योजनेअंतर्गत ४ लाख ३८ हजार १३१ महिला खातेधारक आहेत. त्यांना याचा लाभ मिळणार आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांनाही २ हजार रुपयांप्रमाणे रक्कम मिळणार असून या योजनेत जिल्ह्यात ६ लाख ९ हजार ७४१ खातेधारक आहेत असे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT