संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना आदेशाची प्रतीक्षा 

टीम अॅग्रोवन

नगर   ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत नियमित व दोन लाखांपेक्षा जास्त थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने अर्थसंकल्पात घोषणा केली. जिल्ह्यातील नियमित व दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या थकबाकीदार शेतकऱ्यांची एकूण संख्या एक लाख १७ हजार ८१६ आहे. कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या शेतकऱ्यांना या घोषणेमुळे लाखमोलाचा दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे. यासाठी प्रशासनाने पूर्वतयारीही सुरू केली आहे. या संदर्भात दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना आदेशाची प्रतीक्षा आहे. 

कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात ३० सप्टेंबर २०१९ अखेर थकीत व पुनर्गठित असलेले दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय झाला. यात नगर जिल्ह्यातील १५९८ गावांत असणाऱ्या दोन लाख ५३ हजार ४५५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यात एक लाख ७६ हजार ६३९ शेतकऱ्यांना आजअखेर १०२५ कोटींचा लाभ झाला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जमाफीची योजना विनाविलंब सुरू आहे. दोन लाखांच्या अटी, शर्तीमुळे बहुतांश शेतकरी वंचित राहिले होते. त्यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी होत होती.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही बहुतांश वेळा नियमित, तसेच दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकार लवकरच योजना आणणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला जात होता. अखेर कर्जमुक्ती योजनेच्या बाहेर राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने ठोस पाऊल उचलले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. ६) विधिमंडळात अर्थसंकल्प मांडला. यासाठी १५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत असल्याचे सांगितले. जिल्ह्यात नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार दिले जाणार आहेत. दोन लाखांपेक्षा कर्ज असणाऱ्यांनाही कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. 

अशी आहे जिल्ह्यातील स्थिती 

  • दोन लाखांपेक्षा जास्त थकबाकीदार कर्ज खात्यांची संख्या  : १२,१२९
  • रक्कम (लाखात)  : २७, ६८५.८६ 
  • नियमित भरणा करणाऱ्यांची संख्या  : १,०५,६८७ 
  • कर्ज भरलेली रक्कम (लाखांत)  :  ६३,६१७.९३
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

    MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

    Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

    Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

    Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

    SCROLL FOR NEXT