संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सांगलीत ‘स्वाभिमानी’चा उद्या संपूर्ण कर्जमाफीसाठी मेळावा

टीम अॅग्रोवन

सांगली  ः राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीची योजना फसवी आहे, यामध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार करण्यात आलेला नाही. तसेच २ लाखांवर कर्ज असणाऱ्यांनादेखील वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. या सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शुक्रवारी (ता. ३) दुपारी तीन वाजता सांगली येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली. 

या मेळाव्याला माजी खासदार राजू शेट्टी, रविकांत तुपकर, जालिंदर पाटील, विशाल पाटील उपस्थित राहणार आहेत. श्री. खराडे म्हणाले, की भाजप सरकारने कर्जमाफी केली त्यावेळी अनेक निकष लावले. त्या निकषांची पूर्तता करताना शेतकऱ्यांची दमछाक झाली. या सरकारने कोणतेही निकष लावणार नाही असे सांगून २ लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवले आहे. त्याच बरोबर सप्टेंबर २०१५ पूर्वी कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचाही योजनेत समावेश नाही.  सातबारा कोरा करतो, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यम मुदत कर्जाचाही योजनेत समावेश केलेला नाही. ट्रॅक्‍टर, पाइपलाइन, विहीर खोदाई, ग्रीन हाउस, द्राक्ष उभारणी, शेततळ्यासाठी लागणारा कागद, ठिबक सिंचन, गोठा उभारणी आदींसाठी घेतलेल्या कर्जाचा विचारच केला गेलेला नाही. यामुळे ७५ ते ८० टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. या सर्व शेतकऱ्याचा कर्जमाफी योजनेत समावेश व्हावा, यासाठी स्वाभिमानीकडून लढा उभारण्यात येणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

Indian Monsoon : पाऊसकाळ उत्तम, पुढे काय?

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

SCROLL FOR NEXT