संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

वैधानिक विकास मंडळांची मुदत संपली

मुंबई : प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाची मुदत गुरुवारी (३० एप्रिल) संपुष्टात आली असली तरी या मंडळांना मुदतवाढ देण्याबाबत आघाडी सरकारने तूर्तास सबुरीचे धोरण घेतले आहे.

टीम अॅग्रोवन

मुंबई : प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाची मुदत गुरुवारी (३० एप्रिल) संपुष्टात आली असली तरी या मंडळांना मुदतवाढ देण्याबाबत आघाडी सरकारने तूर्तास सबुरीचे धोरण घेतले आहे.

राज्य घटनेच्या कलम ३७१ (२) नुसार राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळांची स्थापना करण्यात आली. या मंडळांची मुदत पाच वर्षांची असते. मंडळाच्या स्थापनेपासून सरकारने या मंडळांना मुदतवाढ दिली आहे. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्तीवरुन सरकार आणि राज्यपालांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. ठाकरे यांच्या नियुक्तीबाबत मंत्रिमंडळाने दोनदा शिफारस करुनही राज्यपालांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही. अशातच राज्यपालांनी वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ देण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत. सरकारने यावर अजून निर्णय घेतलेला नाही.

वैधानिक विकास मंडळांची मुदत संपली तरी त्यांना लगेच मुदतवाढ देण्याची आवश्यकता नाही. मुदतवाढ कधी द्यायची याचा निर्णय सरकार घेऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. विकास मंडळांचा कालावधी ३० एप्रिलला संपला असून मंडळांना मुदतवाढ न मिळाल्यास मागास भागांची २५ वर्षांची लढाई संपुष्टात येईल, अशी भीती फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Grape Vineyard Pruning: द्राक्ष बागांमध्ये छाटणीला वेग

Manoj Jarange Health Issue: मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली

Paddy Crop Disease: सिंधुदुर्गातील भातशेतीवर करप्याचा प्रादुर्भाव

Rainfall Deficit: पावसाअभावी नरसिंहपूर, टणू परिसरातील पिकांची वाढ खुंटली

FFS Fertilizer Sales: ‘एफएफएस’मधून २३ जिल्ह्यांत खतांची विक्री

SCROLL FOR NEXT