संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन

पुणे  : मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान झाल्याने राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. आज (ता. ३०) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पाऊस पडणार असून, विदर्भातही हलक्या ते मध्यम सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बुधवारी (ता.२९) दुपारनंतर कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली होती.    

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकून सर्वसामान्य स्थितीत आला आहे. बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेश, तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात पाऊस सुरू होण्यास पोषक हवामान होत आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगांची दाटी होऊ लागली होती. 

आज (ता. ३०) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, नंदूरबार, धुळे, जळगाव, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागातही ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

बुधवारी (ता. २९ ) सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत - हवामान विभाग) : कोकण : कुलाबा ८९, वसई ७४, विक्रमगड ५१, अलिबाग ९३, खालापूर ३६, मुरूड ५३, मालवण ४५, अंबरनाथ ७०, भिवंडी ६५, उल्हासनगर ५१. मध्य महाराष्ट्र : पाथर्डी ४५, ओझरखेडा ३१, बार्शी ४२,  मराठवाडा : वसमत ३७, चाकूर ६१, शिरूर अनंतपाळ ५३, पूर्णा ३५.  विदर्भ : धामणगाव रेल्वे ३०, नांदगाव काझी ४७, भद्रावती ५२, ब्रह्मपुरी ४७, गोंडपिंपरी ४१, जेवती ३४, कोर्पणा ४१, मूल ४३, पोंभुर्णा ८५, वरोरा ६१, चामोर्शी ३०, एटापल्ली ३४, हिंगणा ३०, देवळी ३४, समुद्रपूर ३७, सेलू ४९, वर्धा ५०, करंजालाड ३५, मंगरूळपीर ३०, मानोरा ६४, अर्णी ४१, बाभुळगाव ५८, दारव्हा ४०, यवतमाळ ३२. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

World Veterinary Day : मानवी आरोग्यातही पशुवैद्यकाचे बहुमूल्य योगदान

Agricultural Exports : खेळखंडोबा शेतीमाल निर्यातीचा!

Lok Sabha Election 2024 : टपाली मतदानास १,६६२ मतदारांची पसंती

Lok Sabha Election 2024 : सात हजार कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविण्यास सुरुवात

Banana Orchard Damage : सारी केळी भुईसपाट

SCROLL FOR NEXT