संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

राज्यात आजपासून वादळी पावसाची शक्यता

पुणे : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे. अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे संकेत असून केरळ, कर्नाटक किनाऱ्यालगत ढगांची दाटी होऊ लागली आहे. आजपासून (ता.३१) राज्यात पूर्वमोसमी पावसाला सुरवात होणार आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. तर उद्यापासून (ता.१) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

टीम अॅग्रोवन

पुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे. अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे संकेत असून केरळ, कर्नाटक किनाऱ्यालगत ढगांची दाटी होऊ लागली आहे. आजपासून (ता.३१) राज्यात पूर्वमोसमी पावसाला सुरवात होणार आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. तर उद्यापासून (ता.१) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पूर्वमोसमी पावसाला पोषक वातावरण होताच राज्यात जोरदार वारे वाहू लागले आहेत. तापमानात काही प्रमाणात घट झाली असली तरी उन्हाचा चटका कायम आहे. विदर्भातील अमरावती, ब्रह्मपूरी, चंद्रपूर, नागपूर येथे तापमान ४५ अंशापेक्षा अधिक असल्याने उष्ण लाट आली आहे. विदर्भातही तापमानात घट होत असून, पूर्वमोसमी पावसामुळे उष्ण लाट कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शनिवारी (ता.३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील चंद्रपूर येथे उच्चांकी ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाल्याने अंशत: ढगाळ हवामान होत आहे. दिवसभर चटका कायम राहून दुपारनंतर वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अरबी समुद्रात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत आल्यानंतर कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातही मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.   शनिवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.५, जळगाव ४२.२, कोल्हापूर ३६.१, महाबळेश्‍वर ३०.१, मालेगाव ४३.८, नाशिक ३६.६, निफाड ३५.२, सांगली ३७.७, सातारा ३६.९, सोलापूर ४१.१, डहाणू ३५.४, सांताक्रूझ ३४.९, रत्नागिरी ३५.०, औरंगाबाद ४०.६, परभणी ४४.०, नांदेड ४३.०, अकोला ४४.७, अमरावती ४५.५, बुलडाणा ४०.५, ब्रह्मपुरी ४५.०, चंद्रपूर ४५.६, गोंदिया ४४.२, नागपूर ४५.६, वर्धा ४४.५. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jayakwadi Project: ‘जायकवाडी टप्पा-२’चा प्रस्ताव आता कॅबिनेटसमोर

Blacklisted Institutions: ‘त्या’ सहा संस्थांना काळ्या यादीतून वगळणार?

Marigold Flower: झेंडूच्या फुलांची आवक बाजारात वाढली

Banana Harvest Issue: खानदेशात अनेक भागांत केळीची काढणी ठप्प

Ethanol Market: उसाला मागे टाकत मक्यापासून इथेनॉल केंद्रस्थानी

SCROLL FOR NEXT