प्रक्षेत्रावर  सोयाबीनच्या एमएयुएस 71 वाणाचे पैदासकार बिजोत्पादन घेण्यात आले.
प्रक्षेत्रावर सोयाबीनच्या एमएयुएस 71 वाणाचे पैदासकार बिजोत्पादन घेण्यात आले.  
मुख्य बातम्या

‘वनामकृवि’त सोयाबीनच्या पैदासकार बियाण्यासाठी बीजोत्पादन कार्यक्रम

टीम अॅग्रोवन

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर यंदाच्या उन्हाळी हंगामात सोयाबीनच्या ‘एमएयूएस ७१’ या वाणाच्या पैदासकार बियाणे उत्पादनासाठी सुमारे ४० हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्यामुळे येत्या खरीप हंगामात या वाणाचे आनुवंशिकदृष्ट्या शुद्ध पैदासकार बियाणे उपलब्ध होईल, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली.

२०१८-१९ च्या हंगामात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर उत्पादित सोयाबीनच्या ‘एमएयूएस ७१’ या वाणाचे पैदासकार बियाणे महाबीजमार्फत शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले होते. लातूर जिल्ह्यातील १७ शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या एका लॅाटच्या एकूण ३३ क्विंटल बियाण्यांची ५० हेक्टरवर पेरणी करण्यात आली होती. परंतु, या लॅाटच्या बियाण्यांमध्ये अन्य वाणांच्या बियाण्यांची भेसळ आढळून आल्यामुळे सुमारे ५०० क्विंटल बियाणे नापास ठरले. त्यामुळे महाबीजने विद्यापीठाकडे सात लाख रुपये भरपाईची मागणी केली.

सोयाबीनच्या ‘एमएयूएस ७१’ या वाणाच्या पैदासकार बियाण्यातील भेसळ ही बाब गंभीर आहे. त्यामुळे येत्या काळात आनुवंशिकदृष्ट्या शुद्ध पैदासकार बियाण्याचा पुरवठा करण्यासाठी यंदाच्या उन्हाळी हंगामात विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर सुमारे ४० हेक्टरवर सोयाबीनच्या ‘एमएयूएस ७१’ या वाणाच्या पैदासकार बियाणाचा बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येत आहे. यापासून सुमारे २०० क्विंटल बीजोत्पादन अपेक्षित आहे. त्याद्वारे येत्या खरीप हंगामात विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर १०० हेक्टरवर पैदासकार बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येईल. त्यानंतर २०२१-२२ च्या हंगामात महाबीजला या वाणाच्या पैदासकार बियाण्यांचा पुरवठा केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT